Lockdown : पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

संदीप भोसले (वय 43) असे निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसले हे पोलीस मुख्यालयात नेमणूकीस होते. आरपीआय विभागात ड्युटी होती. ते शिवाजीनगर पोलीस लाईन येथे राहत होते. त्यांना दोन मुलं आहेत.

दरम्यान आज सकाळी ड्युटीवर गेल्यानंतर त्यांना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक छातीत दुखत असल्याने निदर्शनास आले. त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना मायनर हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलीस दलात व भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसला आहे.