दुर्दैवी ! पुण्यात पोलिस हवालदाराचा कोरोनामुळं मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे शहर पोलीस दलातील हा 5 वा बळी गेला आहे. यघटनेने पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस हवालदार विनोद पोतदार (वय 51) असे मृत्यू झाालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोतदार हे वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना ब्लड प्रेशरचा (बीपी) त्रास होता. याच दरम्यान त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता.

त्याचा धक्का त्यांना बसला. उपचार सुरु असताना त्यांचा काल त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मूल असा परिवार आहे. पोतदार यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि कामाच्या पद्धतीने ते ओळखले जात होते.