Pune : 200 रूपयांसाठी पोलिसांच्या प्लॉस्टिक ‘लाठी’चीच चर्चा, पोलिस कर्मचार्‍यांकडून अनुदानाबाबतची ‘शाळा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे पोलीस का चर्चेत असतील याचा आता काही नेमच राहिला नसून सध्या गाजला जात आहे तो पोलिसांच्या “प्लास्टिक लाठी”चा विषय. ती गाजतीय फक्त “दोनशे” रुपयांसाठी. कारण, पोलिसांना मिळणाऱ्या अनुदानातून ते प्लास्टिक लाठी घेत नसल्याचे निदर्शनास आले असून, वरिष्ठांनी हे पैसे सर्व पोलीस ठाण्याकडून घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पोलीस कर्मचारी लाठीचे पैसे कुठं खर्च होतात किंवा करतात हे गंमतीने चर्चा करत आहेत.

पुणे पोलीस अनेकविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी नवीन सुविधा तर कधी भल्या मोठ्या कामगिरीने. कधी-कधी खळबळ माजवणाऱ्या गुन्ह्यांमुळे देखील पुणे पोलीस राज्यात फेमस असतात. गेल्या काही वर्षात पुणे पोलिसांची कामगिरी उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यात टेक्नोसॅव्ही उपक्रमा अंतर्गत पुणेकरांना सुविधा, सेवा आणि गुन्हेगारांना योग्य प्रसाद देत असल्याने नागरिक ते मंत्री आणि गुन्हेगार ते कामगार यांच्यापर्यंत पुणे पोलीस पोहचले आहेत. पण सध्या विषय गाजतोय तो पोलिसांच्या लाठीचा. पोलिसांची बंदूक, लाठी आणि बेल्ट हे महत्त्वाचे भाग. त्यात दशहत असते ती पोलिसांची लाठीची. गमतीने पोलिसांची लाठी खाऊ नये असे गंमतीने म्हटले जाते. पोलीस नसले आणि त्यांची लाठी दिसली तरी गुन्हेगारांनाच नाही तर सर्व सामान्य माणसांना देखील एक प्रकारे भिती असते. अर्थातच चुकीचे पाऊल टाकलेले नी टाकणाऱ्यांना असते.

पुणे पोलिसांत आता या लाठीची चर्चा सुरू झाली आहे. कारण, दरवर्षी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना गणवेश अनुदान मिळते. साधारण ते 5 हजार असते. त्यातुन त्यांनी गणवेश, लाठी, शूज, बेल्ट टोपी यासह 25 वस्तू खरेदी करन अपेक्षित असते. फायबर लाठी देखील असते. मात्र पोलीस कर्मचारी लाठीचे घेत नसल्याचे दिसून आले आहे. कारण पोलीस ठाण्याकडून मुख्यालय विभागाला लाठी मागणी केली जात आहे. त्या संदर्भात सतत अहवाल आले आहेत. त्यावरून हा प्रकार उघड झाला आहे. तातडीची गरज वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी म्हणून या वर्षात 800 लाठ्या शिवाजीनगर मुख्यालयाला पुरविण्यात आल्या आहेत. त्या प्रत्येक पोलीस ठाण्याला मागणीप्रमाणे देण्यात देखील आल्या आहेत. त्यानुसार कर्मचारी ते सहायक उपनिरीक्षक यांच्या वेतनातून प्रत्येकी 212 रुपये कपात करून मुख्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 30 पोलीस ठाण्याकडून आता पैसे भरले जाणार आहेत.

मात्र यातून पोलीस कर्मचारी अनुदान मिळाल्यानंतर लाठी घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अनुदानाची रक्कम कमी पडत आहे की त्यांचे पैसे कोठे खर्च होतात हा संशोधनाचा विषय आहे. पण चर्चा आहे ती लाठी आणि आता त्याचे पैसे भरण्याची.