धक्कादायक ! पुण्यात सोमवार पेठेत पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस नाईक संजय बनसोडे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय बनसोडे हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. दरम्यान त्यांना दारूचे व्यसन होते. मात्र काही महिन्यांपासून त्यांनी दारू सोडली होती. तर त्यांचे घरघुती वाद देखील असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या पंधरा दिवसापासून ते ड्युटीवर हजर झाले होते. त्यापूर्वी दीड महिना गैरहजर होते. सोमवार पेठेत राहण्यास होते. काल शनिवारी नेहमी प्रमाणे ड्युटीकरून घरी गेले. पण आज ड्युटीवर आले नाही. त्याच दरम्यान आज सकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खडक पोलीस दाखल झाले आहेत. माहिती घेतली जात आहे.