पुण्यातील पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बालाजीनगर येथील पंपावर लावलेल्या गाडीला जॅमर लावून गाडी सोडण्यासाठी चालकाकडून दीड हजार रुपये घेऊन सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी वाहतूक शाखेतील एका पोलीस शिपायाला तडकाफडकी निलंबित केले आहे. विक्रम गणपत फडतरे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

विक्रम फडतरे हे भारती विद्यापीठ वाहतूक शाखेत कार्यरत होते. सागर राऊत (रा. राजेवाडी, ता. खंडाळा. जि. सातारा) यांनी 27 नोव्हेबर रोजी सकाळी साडेआठ वाजता बालाजीनगर येथील पापामध्ये त्याची जीप लावली होती. या गाडीला विक्रम फडतरे यांनी जॅमर लावला. गाडीचा जॅमर काढण्यासाठी फडतरे याने राऊत यांच्याकडे पाच हजार रुपयांची पावती फाडावी लागेल असे सांगितले.

त्यानंतर सागर राऊत याच्याकडून दीड हजार रुपये घेऊन जॅमर काढून निघून गेले. राऊत यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत फडतरे हा दोषी आढळ्याने पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी फडतरे याला शुक्रवारी (दि.13) निलंबित केले. या कारवाईमुळे वाहतूक शाखेत खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/