Pune : मुदत पुर्व बदल्या झालेल्या नाराज कर्मचार्‍यांची अन्याय झाल्याची भावना, न्यायासाठी घातले पोलिस आयुक्तांना साकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहर पोलीस दलातील ते “नाराज” कर्मचारी आज सकाळी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यास आयुक्तालयात दाखल झाले आहेत. मुदतपूर्व बदल्या झालेले हे कर्मचारी आयुक्तांना भेटण्यास आल्याचे समजते. त्यांच्यात अन्याय झाल्याची भावना आहे.

पुणे पोलीस दलातील तबल 1289 कर्मचाऱ्यांच्या बदल्या दोनच दिवसांपूर्वी झाल्या आहेत. यात नियमाने दरवर्षी होणाऱ्या बदल्या प्रक्रियेनुसार बदल्या केल्या आहेत. 6 वर्ष एकाठिकणी नोकरी केल्यानंतर त्यांची बदली होते. तर काही बदल्या त्या-त्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या असतात. तर काही “डिफॉल्ट रिपोर्ट” आलेल्या कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या जातात.

यावेळी देखील आयुक्तांनी नियमानुसार बदल्या केल्या आहेत. पण यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या झाल्या आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

त्यामुळे हे कर्मचारी आज सकाळीच पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांची भेट घेण्यास गेले आहेत. त्यांना विनंती करून या बदल्या रद्द कराव्या असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता आयुक्त काय निर्णय घेतात याकडे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

—चौकट—

नेमकं प्रकरण काय आहे

पूर्व आयुक्तांनी बदल्या संदर्भात पोलीस ठाण्यांना नटोरियस कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. त्यात मुदतपूर्व, कार्यकाळ झालेले व विनंती कर्मचारी देखील होते. या बदल्यात या कर्मचाऱ्यांचे नावे आहेत. आता त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे हे कर्मचारी आयुक्तांची भेट घेण्यास गेल्याचे कळते.