पुणे पोलिसांनी केलं ‘कौतुका’स्पद काम, इशान्यकडील 150 विद्यार्थ्यांना दिलं अन्नधान्य

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  देश लॉकडाऊन झाल्याने अनेकजण अडकून पडले असून, पुण्यात अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांही अडकले आहेत. सर्व बंद असल्याने त्यांची खाण्याची अडचण झाली होती. ही माहिती अरुणाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांला समजले. त्यांनी ही माहिती त्यांचे बॅचमेट व पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी या 150 विद्यार्थ्यांना अन्यधान्य वाटप केले. पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले.

देश भरात लॉकडाऊन केल्यानंतर सर्व प्रवाशी सेवा देखील बंद केले आहेत. तर राज्यात संचारबंदी लागू आहे. यामुळे परराज्यातील कामगार, विद्यार्थी तसेच व्यावसायिक पुण्यात अडकले आहेत. सर्व आस्थापना बंद असल्याने या विद्यार्थ्यांची खाण्या-पिण्याच्या अडचणी सुरू झाल्या आहेत.

ईशान्य भारत व अरुणाचल प्रदेशातील 150 विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते. त्यांना गावी जात येत नव्हते. दरम्यान त्यांनी ही माहिती गावी देखील दिली होती. त्यावेळी तेथील प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रशांत लोखंडे यांनी पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना ही अडचण सांगितली. त्यानंतर डॉ. शिसवे यांनी याची दखल घेतली. तसेच या सर्वांशी संपर्क साधला. त्यांना छोट्या-छोट्या गटाने बोलवून त्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू सोशल डिस्टन्सिंग पाळून देण्यात आले. यामध्ये ९४ विद्यार्थी व इतर कामगार अशा १५० जणांना मदत केली. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी त्यांच्या विद्यार्थी व कामगारांना पुणे पोलिसांनी केलेल्या तत्काळ मदतीबद्दल ट्विट करून डॉ. रवींद्र शिसवे यांचे आभार मानले.

डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रशांत लोखंडे हे माझे बॅचमेट आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणीची फोन करून मला माहिती दिली. त्यानंतर ही मदत केली.