Pune Political News | कसबा पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने प्रथमच आमने-सामने, हस्तांदोलन करुन म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Political News | पुण्यातील कसबा पोटनिवडणुक (Pune Kasba Peth Bypoll Election) अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे विजयी झाले. कसबा पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर आणि भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) हे दोघेही पहिल्यांदाच (Pune Political News) आमने सामने आले. खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधीतून साकारलेल्या भित्ती चित्राचं लोकार्पण गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हे दोन नेते एकत्र आले होते. यावेळी दोघेही हसत कार्यक्रमात सहभागी झाले. दोघांनी मिळून भित्तीचित्राचे लोकार्पण करुन हस्तांदोलन केले. निवडणुकीच्या निकालानंतर ते दोघे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आम्ही प्रतिस्पर्धी नसतो तर.. – हेमंत रासने

यावेळी हेमंत रासने म्हणाले, निवडणुकीच्या वेळी आम्ही प्रतिस्पर्धी नसतो तर वेगवेगळ्या मतप्रवाहाचे उमेदवार असतो. केलेल्या कामासाठी आशीर्वाद मागत असतो. जनता दोघांनाही आशीर्वाद देते मात्र ज्याला जनता जास्त आशीर्वाद देते तो विजयी होतो आणि दुसरा उमेदवार त्याच्या पद्धतीने काम करत असतो, असे रासने यांनी सांगितले. (Pune Political News)

मी गिरीश बापटांचा आभारी आहे – रवींद्र धंगेकर

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, मागील तीन दशकं गिरीश बापट यांनी पुण्याचा विकास केला. राजकीय स्तर कसा ठेवावा? हे त्यांनी मला आणि हेमंत रासने यांना एकत्र आणून पुन्हा एकदा शिकवलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. गिरीश बापट यांनी काम करताना समाजाचा समतोल ठेऊन काम केलं आहे. त्यांच्या विरोधात मी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी मी बापटांचा अभ्यास केला आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. हेमंत रासने आणि मी मागील 15 वर्ष एकत्र काम करत आहोत, असंच काम करत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता समाजकारणाचं युद्ध सुरू

दरम्यान, शिवजयंतीच्या कार्यक्रमातच या दोन नेत्यांची समोरा समोर भेट होणार होती.
मात्र रवींद्र धंगेकर कार्यक्रमाच्या स्थळी उशीरा आल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
त्यावेळी विधानसभेतून शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी धंगेकर यांनी होम ग्राऊंड गाठलं होतं.
कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पहिल्यांदाच हेमंत रासने यांच्यावर भाष्य
केलं होतं. आमच्यातील राजकारणाचे युद्ध संपले असून आता समाजकारणाचं युद्ध सुरु झालंय,
आम्ही हातात हात घलून सोबत लढू, गेले 15 वर्ष आम्ही सभागृहात सोबत काम केले आहे,
असं म्हणत धंगेकर यांनी महापालिकेतील सोबतची आठवण करुन दिली होती.

Web Title : Pune Political News | kasba elections hement rasne and ravindra dhangekar meet after pune bypollss

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 3 लाखांच्या कर्जाचे 4 लाख 20 हजार परत केल्यानंतरही आणखी 10 लाखांची मागणी; पैसे न दिल्यास गहाण ठेवलेली गाडी पेटवून देण्याची धमकी, दोघा सावकारांवर गुन्हा दाखल

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरींच्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं, पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा

Devendra Fadnavis On Chaskaman | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – देवेंद्र फडणवीस