Pune Political News | भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक – अजित पवार

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Political News | महानगरपालिका निवडणुकीच्या (municipal corporation election in maharashtra) पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) अनेक नगरसेवक (corporator) राष्ट्रवादीत (NCP) येण्यास उत्सुक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, जे पक्षात येऊ इच्छितात त्यांना मला एक सांगायचं आहे की, तुमचं डिस्कॉलिफिकेश होता कामा नये. तसं झालं तर सहा वर्षासाठी अपात्र होतात. आता काही जण पक्षात आले आहे ते अपक्ष आहेत असेही पवार यांनी (Pune Political News) स्पष्ट केले.

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. ज्ञानशांती शाळेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जबरदस्त हवा होती आणि त्यावेळी महाराष्ट्रात सत्तेचा कशा प्रकारे वापर झाला,हे सर्वांनी पाहिलेलं आहे. वार्ड रचना करताना नगरसेवकाला कसा त्रास होईल हे पाहिलं जायचं. असलं खालच्या पातळीचे राजकारण मी केलं नाही. महापालिका ताब्यात असले तर अधिक चांगली कामे होतात हे पिंपरी-चिंचवडकरांना माहीत आहे. गेल्या २५ वर्षात इथला झपाट्याने विकास झाला आहे. आज भाजपमध्ये नगरसेवक (BJP Corporator) असले तरी त्यांना माझ्या पक्षाच्या मार्फत तिकीट दिलेलं आहे. चढ-उतार येत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिक कामं केली तर निवडून देणार. माझ्या मते याला वेगळा आणि तो भाग घ्या असं काही नसतं. परंतु, त्यावेळेस इतकं काम करून देखील जनतेच्या दिलेल्या कौलामुळ विरोधी पक्षात बसावं (Pune Political News) लागलं. अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली.

Web Title : Pune Political News | pimpri-chinchwad-many-bjp-corporators-are-in-touch-ajit-pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा जास्तच्या टॅक्स चोरीत सहभाग – प्राप्तीकर विभाग

Maharashtra Rains | विकेंडपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट

Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना