Pune Politics News | पुण्यात भाजपची तयारी ‘झटका’ मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Politics News | भाजपने (BJP) सर्वच लोकसभा (Lok Sabha Seat In Maharashtra) आणि विधानसभा मतदार संघांमध्ये (Maharashtra Vidhansabha) निवडणुकीची तयारी केल्याने मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) Shivsena (Shinde Group) धक्का बसला आहे. विशेष असे की या निर्णयामुळे 2019 मध्ये युती असताना संयुक्त शिवसेनेला शहरात एकही जागा न सोडणाऱ्या भाजपने पुन्हा आठही जागा पदरात पाडून घेतल्यास शिंदे गटाला हात चोळत बसावे लागणार आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला Shivsena (UBT) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काढल्यास किमान कोथरूडची (Kothrud Vidhansaba) जागा मिळण्याची शक्यता वाढली आहे. (Pune Politics News)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकतेच दिल्लीत भेट घेतल्यानंतर शिवसेना आगामी निवडणुका भाजपसोबत युतीत लढणार असल्याची घोषणा केली. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच ‘मातोश्री’ (Matoshree) ऐवजी ‘दिल्लीत’ भाजप दरबारी (Delhi BJP Office) युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. हे सर्वसामन्या शिवसेनेच्या मतदारांना रुचले नाही. अशातच भाजपने राज्यातील सर्वच लोकसभा आणि विधानसभा मतदार संघात वर्षभरापूर्वी तयारी सुरू केल्याने शिंदे गटासोबत गेलेल्या इछुकांच्या पोटात गोळा आला आहे. आतापर्यंत केंद्राकडून येणाऱ्या नेत्यांनी सर्वच लोकसभा मतदार संघात बांधणी साठी बैठका घेऊन निवडणुकीचे नियोजन केले असून. आता राज्य भाजपने प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठीची कमान स्थानिक नेतृत्वाच्या हाती सोपविली आहे (BJP Maharashtra Election Chief) . ही कमान सोपवताना पक्षातील इच्छुकांना देखील तिकीट वाटपाच्या वेळी डावलले तरी ‘हालचाल’ करायची नाही, असे फासे टाकत सूक्ष्म प्लॅंनिंग केल्याचे या नियुक्त्यांवरून प्रथमदर्शनी दिसते. (Pune Politics News)

 

यासोबतच भाजपने शिंदे यांच्या शिवसेनेला देखिल अधिपत्याखाली ठेवून 2014 प्रमाणे जिल्हयातील सर्वच जागांवर लढायची वेळ आल्यास भाजप तयार आहे, याची चुणूक या निवडीतून दाखवली आहे. जिल्ह्यात हडपसर (Hadaspar Vidhansaba), खडकवासला (Khadakwasla Vidhansabha), जुन्नर (Junner Vidhansabha), आंबेगाव (Ambegaon Vidhansabha) आणि पुरंदर (Purandar Vidhansabha) मध्ये शिवसेना फुटल्यानंतर दिगग्ज नेते शिंदे गटासोबत गेले आहेत. तसेच शिरूरचे माजी खासदार देखील शिंदे गटात गेले आहेत.

पुरंदर मध्ये बाबाराजे जाधवराव (Babaraje Jadhavrao) यांच्याकडे कमान सोपवत त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना देखील झटका देण्यात आहे. जाधवराव यांचे वडील दादा जाधवराव (Dada Jadhavrao) हे जनता दलाकडून या मतदार संघात सातत्याने निवडून आले आणि मंत्री देखील होते. बाबाराजे यांनी मात्र अगोदर मनसे (MNS) आणि नंतर भाजपची वाट धरली. तर नुकतेच राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार अशोक टेकवडे (Ashok Tekawade) भाजपवासी झाले. त्यामुळे बेरजेचे राजकारण करत भाजपने शिवतारे यांना ‘दिवे’ घाट (Dive Ghat) दाखवल्याने शिवतारे यांचे राजकारण ‘थांबवण्याची’ तयारी भाजपने केल्याचे पाहायला मिळत आहे.

 

शिंदे बाहेर पडल्यानंतर महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) त्यांच्यासोबत गेले. त्यांची शहर प्रमुखपदी वर्णी लागली. पूर्वी देखील शिवसेनेतून फुटून मनसेकडून हडपसर मतदार संघातून नशीब आजमवणारे भानगिरे पराभूत झाल्यानंतर पुन्हा सेनेत परतले होते. परंतु हा मतदार संघ भाजपकडे असल्याने त्यांना 2019 मध्ये हडपसर मधून संधी मिळाली नाही. शिंदे गटात गेल्यानंतर 2009 च्या जागा वाटपानुसार पुन्हा हा मतदार संघ शिवसेनेकडे मागून घेता येईल या भरवश्यावर त्यांनी हडपसर मतदार संघातून तयारी केली आहे. एवढेच न्हवे तर संघटन वाढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा देखील प्रयत्न सुरू ठेवल्याचे काही घटनांवरून पाहायला मिळाले आहे. मात्र या मतदार संघात भाजपने माजी आमदार योगेश टिळेकर (Yoesh Tilekar) यांना जबाबदारी दिली आहे. यामुळे संघ बदलूनही नाना भानगिरे हे कट्टर शिंदे समर्थक विधान मंडळात जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.

 

लगतच्या खडकवासला मतदार संघातून उमेदवारीसाठी रमेश कोंडे (Ramesh Konde) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु सलग तीनवेळा या मतदार संघांमध्ये बाजी मारणाऱ्या भाजपने सचिन मोरे (Sachin More BJP) यांच्याकडे मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच लोकसभेचा विचार करता राहुल कुल (MLA Rahul Kul) यांना तयारीसाठी लावले आहे. बारामती लोकसभा ताब्यात घेण्यासाठी खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडे जबाबदारी दिली असताना भाजप खडकवासला मतदार संघ कुठल्याही परिस्थितीत सोडणार नसल्यावर नवीन नियुक्त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

Advt.

विशेष असे की हडपसर आणि खडकवासला मतदार संघाचा बहुतांश भाग हा पुणे महापालिका हद्दीत असून
पुरंदर चे काही हजार मतदार महापालिका हद्दीत आहे. लोकसभा (Pune Lok Sabha) आणि
विधानसभा निवडणुकीसोबतच महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या नियुक्त्या केल्याने कुठल्याही
निवडणुकीच्या जागा वाटपावेळी शिंदे गटाला बॅक फुटवर जावे लागेल, अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचे दिसत आहे.

याउलट 2014 मध्ये भाजप पासून स्वतंत्र लढणाऱ्या शिवसेनेने शहरातील आठही जागांवर उमेदवार दिले होते.
सर्वच ठिकाणी भाजपचा विजय झाला. तर लगतच्या पुरंदर मधून विजय शिवतारे हे एकमेव आमदार निवडून आले होते.
मात्र याच शिवतारे यांना राज्यमंत्री असूनही 2019 च्या निवडणुकी मध्ये शिवसेना – भाजप युती असतानाही पराभव स्वीकारावा लागला.
2014 पुण्यातील आठही मतदार संघ मिळून शिवसेनेच्या मतांची बेरीज ही दुसऱ्या क्रमांकाची राहिली होती.
मात्र निवडणूक पश्चात युतीमुळे 2019 च्या जागा वाटपात भाजपने आठही जागांवर दावा सांगत त्या पदरात पाडून घेतल्या.
शिवसेनेला कोथरूड , हडपसर सारख्या बालेकिल्ल्यात उमेदवारही देता आला नाही.
मात्र मागील वर्षी शिवसेनेची शकले पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी मध्ये कोथरूड,
शिवाजीनगर (Shivaji Nagar Vidhansabha), खडकवासला या मतदार संघावर पुन्हा दावा ठोकू शकतो अशी परिस्थिती आहे.
यामुळे उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेला शहरातुन पुन्हा विधानसभा खुणावत असल्याचे प्रथमदर्शनी भाजपच्या तयारीवरून दिसत आहे.

 

Web Title :  Pune Politics News | BJP’s preparation in Pune is a ‘blow’ to Eknath Shinde’s Shiv Sena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा