Pune Politics News | शिरुरमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छूक, अजित पवार म्हणाले- ‘मग बिघडले कुठे?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Politics News | लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), भाजप-शिवसेना युतीने (BJP-Shiv Sena Alliance) जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष संघटना मजबूत करण्याची तयारी करत आहे. तर जागावाटपावरुन सर्वच पक्षांच्या बैठका सुरू आहेत. दुसरीकडे इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Politics News) शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे (Former NCP MLA Vilas Lande) यांनी निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी देखील निवडणूकीची तयारी सुरु केली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency) राष्ट्रवादीचे दोन नेते इच्छूक असल्याने पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर राष्ट्रावादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, शिरुर लोकसभा मतदार संघातून (Pune Politics News) निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक असतील, तर बिघडले कुठे? असे सांगत राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. अजित पवार शिरुरमधून इच्छुक असतील तर तुम्हाला त्रास काय आहे, असा प्रतिसवाल अजित पवारांनी केला.

सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न

शिरुर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील
(Dilip Walse Patil) आणि माजी आमदार विलास लांडे यांची नावे चर्चेत आहेत.
याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले, पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) चर्चा
करुन योग्य तो निर्णय घेतली. सक्षम उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल.

त्यामुळे लांडे इच्छुक असतील

Advt.

अजित पवार पुढे म्हणाले, विलास लांडे पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांना खासदारकीची उमेदवारीही दिली होती.
त्यावेळी त्यांना अपयश आले होते. त्यांनी आता गोळाबेरीज आणि आकडेमोड केली असेल.
त्यामुळे तेही इच्छुक असतील. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि विलास लांडे यांची विधाने मी ऐकली आहेत.
कोणाला उमेदवारी द्यायची, हा पक्षांतर्गत प्रश्न आहे.
महाविकास आघाडीत कुठल्या जागा कोणाच्या वाट्याला येतात, हे प्रथम निश्चित होईल.
राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल,असे पवार यांनी सांगितले.

Web Title :  Pune Politics News | contest elections from shirur lok sabha constituency ajit pawar says candidacy pune Lok Sabha Elections 2024

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

1920 Horrors Of The Heart Trailer Out | ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; छोट्या पडद्यावरील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Raigad Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज, सोहळा अर्ध्यात सोडून माघारी

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांकडून एकाला अटक