Pune Politics News | शिरुरमधून उमेदवारी कोणाला? लांडे की कोल्हे, जयंत पाटलांचं सूचक विधान

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Politics News | महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी सुर करण्यात आली आहे. परंतु जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) लोकसभेच्या 48 पैकी 18 जागांवर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) कडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha Constituency) कोणाचा यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु (Pune Politics News) असताना शिरुर लोकसभा मतदारसंघावर (Shirur Lok Sabha Constituency) विलास लांडे (Vilas Lande) यांनी तयारी सुरु केल्याने विद्यमान खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांची जागा धोक्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे (Bhosari Assembly Constituency) राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिरुर मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला मिळणार हे अद्याप ठरलेले नाही. असं असताना कोल्हे यांनी देखील मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून विलास लांडेंना उमेदवारी मिळणार की डॉ. अमोल कोल्हेंना अशी चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सोलापूरमध्ये बोलताना भाष्य केलं. (Pune Politics News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांकडून शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा करण्यात येत आहे.
यावर बोलताना जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे चांगले उमेदवार आहेत,
त्यांनी लोकसभेत उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी बैलगाडा संदर्भात संसदेत केलेली भाषण गाजली आहेत.
अमोल कोल्हे यांची संसदीय कार्यपद्धती उत्तम आहे.
त्यांना अनेक प्रश्नांवर आवाज उठवल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

Advt.

Web Title :  Pune Politics News | jayat patals indicative statement about who will get the lok sabha ticket from shirur constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा