Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Pune Politics News | The displeasure of the aspirants is over, but the activists who sacrificed their lives for them are still angry?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Politics News | दिवाळी पाडव्याचे (Diwali Padwa 2024) निमित्त साधत भाजपचे राज्यातील (BJP Leader) सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पक्षातील नाराज इच्छुकांच्या घरी भेट देत साखर पेरणी केली. परंतु इच्छुकांची नाराजी काही अंशी दूर झाली तरी त्यांना मानणारा आणि कुठलीही राजकीय आकांक्षा नसणारा कार्यकर्ता मात्र अद्याप नाराजच असल्याने प्रचारादरम्यान नाराज फटाक्यांचे ‘प्रदूषण’ कायमच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याने दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. याची बाधा जवळपास सर्वच पक्षांना झाली असून विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) निमित्ताने अनेकांनी डोके वर काढले आहे. याचा सर्वाधिक फटका भाजपला बसला आहे. पुण्यामध्ये भाजपच्या वाट्याला आठ पैकी 6 मतदार संघ आले आहेत. २०१४ मध्ये आठही मतदार संघात कमळ फुलवणाऱ्या भाजपला २०१९ मध्ये दोन मतदार संघ गमवावे लागले. तर उर्वरित सहापैकी तीन मतदार संघात अक्षरशः तीन ते पाच हजारांच्या मताधिक्याने विजय मिळाला. ज्या कसबा मतदार संघात ३० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते त्याच कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत ११ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. विशेष असे की केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) हेच पंतप्रधान असताना मिळालेले यश तेच पंतप्रधानपदी आरूढ असताना कमी झाल्याने भाजपच्या मर्यादा उघड पडल्या.

अशातच मार्च २०२२ पासून राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणे पुणे महापालिकेची निवडणूक (PMC Election) झालेली नाही. २०१७ मध्ये महापलिकेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर ठराविक पाच ते सहा जणांच्या हाती पदे आणि तिजोरीच्या चाव्या दिल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र भावना असल्याचे पाहायला मिळाले. अशातच तीन ते चार टर्म नगरसेवक म्हणून काम पाहिल्यानंतर किमान मतदार संघाची पुनर्रचना होण्यापूर्वी आमदारकीचे बाशिंग अनेकांना खुणावू लागले. त्यांनी यावेळी किमान संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवली होती. गेल्या काही महिन्यांपासून यंदा विधानसभाच एवढेच स्वप्न पाहत इच्छुक प्रयत्नशील होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. परंतु पक्ष नेतृत्वाने पुन्हा विद्यमानांनाच संधी दिली.

त्यामुळे इच्छुक तर नाराज झालेच परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. अडीच वर्ष झाले महापालिका अस्तित्वात नसल्याने अनेक कार्यकर्त्यांच्या हाताला ‘काम’ नाही. त्यांनी तर आता नाही तर कधी नाही अशी भूमिका घेत इच्छुकांच्यामागे भुंगा लावला. कोथरूड (Kothrud Assembly Election 2024), पर्वती (Parvati Assembly Election 2024), शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly Election 2024), कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment Assembly Election 2024), खडकवासला (Khadakwasla Assembly Election 2024) या सहाही मतदारसंघात तसेच वडगाव शेरी मध्ये (Vadgaon Sheri Assembly Election 2024)देखील भाजप मध्ये इच्छुकांची संख्या वाढली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांनी ताणून धरले. परंतु तिकिटे फायनल झाली आणि सर्वच ढेपाळले.

पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडव्याचा मुहूर्त साधून नाराज इच्छुकांच्या घरी भेट देत साखरपेरणी केली. इच्छुकांनी नेत्यांचा शब्दाचा मानही राखला. परंतु त्यांच्या समर्थकांचे मात्र अद्याप समाधान झाले नाही, हे काही कार्यकर्त्यांशी बोलल्यावर समोर येत आहे. यापैकी काहींनी शांत राहायचा निर्णय घेतला तर काहींनी वेगळी भूमिका घेवून ताकत दाखवायची भूमिका मांडली.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)