Pune Pollution | पुण्यासह 18 शहरात प्रदूषण वाढले; मुंबई, सांगली, सोलापूरही ‘प्रदूषित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Pune Pollution | कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) देशातील अनेक शहरातील हवेचे प्रदूषण कमी झाले होते. वास्तविक पर्यावरण विभागाच्या वतीने हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी काही मापदंड ठरवून दिले आहेत. मात्र कोरोनाची लाट ओसरू लागली आणि सर्वत्र निर्बंध कमी होऊ लागले तसे प्रदूषणातही वाढ होऊ लागली. पर्यावरणाच्या मापदंडाला तर काही शहरांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर येत आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे (Ashwini Kumar Choubey) यांनी नुकतीच देशातील 124 प्रदुषित शहरांची नावे संसदेत जाहीर केली. यामध्ये सर्व प्रथम क्रमांक लागतो तो राजधानी दिल्लीचा. दरम्यान सर्वाधिक प्रदूषित शहरे असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचा (Maharashtra) पहिला नंबर येतो. महाराष्ट्रातील पुण्यासह 18 शहरांमध्ये प्रदूषणात (Pune pollution) वाढ झाल्याचे समोर आले.

विविध घटकांवर आधारित हवेची गुणवत्ता असते. त्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून ठरावीक शहराचा प्रदूषणाचा स्तर ठरविणे अवघड आहे.
त्यामुळे काही मापदंड हवेची शुद्धता राखण्यासाठी ठरविण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केलेल्या यादीनुसार दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे (air pollution in Delhi) प्रमाण सरासरी 181 इतके आहे तर भोपाळ 172, अमृतसर 166, जालंधर
165 आणि लुधियानामधील हवेतील प्रदूषणाचा स्तर 161 इतका आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 16,
पश्चिम बंगालमध्ये 7, उत्तराखंड 3, मध्य प्रदेश 6, पंजाब 9, गुजरात 3, आंध्र प्रदेशातील
13 शहरांचा प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो.

हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने विविध उपाय योजना करत आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोच्या उभारणीवर जास्त भर दिला जात आहे.
स्वयंपाकासाठी सिलिंडर वापरण्यावर भर दिला जात आहे.
एवढेच नाही तर 1 एप्रिल 2020 पासून इंधने आणि वाहनांना बीएस 4 आणि बीएस 6 अशी मानांकने लागू करण्यात आली आहेत.

 

देशात सर्वात प्रदूषित शहर दिल्ली

उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंडने घेरलेल्या दिल्लीला सर्वाधिक प्रदूषणाचा फटका बसला आहे. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी 500 ते 1000 पर्यंत असते.
हरियाणा आणि पंजाब येथे तण जाळण्याचे दुष्परिणाम दिल्लीला भोगावे लागतात.
त्यामुळे प्रदूषणाच्याबाबतीत दिल्लीला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहेत.
केंद्र सरकार आणि दिल्लीसह हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेश राज्य अद्यापही यावर तोडगा काढू शकले नाही.

Advt.

महाराष्ट्रातील पुण्यासह मुंबई, सांगली, सोलापूरही प्रदूषित

महाराष्ट्रात चंद्रपूर आणि पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरे असून अकोला, अमरावती, औरंगाबाद,
बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली,
सोलापूर, ठाणे, उल्हासनगर या शहरांमध्येही प्रदूषणात वाढ झाली आहे.

 

Web Title : Pune Pollution | Pollution increased in 18 cities including Pune; Mumbai, Sangli, Solapur also ‘polluted’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Fisheries Business | मत्स्य पालन करून व्हा लखपती, दरमहिना होईल 2 लाखाची कमाई; व्याज फ्री लोन आणि इन्श्युरन्ससह अनेक सुविधा, जाणून घ्या

Pune Crime | ‘दुल्हे राजा’ सिनेमाची कहाणी पुण्यात ! हॉटेल चालकाने टपरीवाल्यावर तलवारीने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Best Investment Plan | ‘इथं’ तुम्हाला 1,000 रुपयांच्या बचतीवर मिळतील पूर्ण 18 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ सुरक्षित स्कीमबाबत सर्वकाही