Pune Porsche Car Accident Case | 2 तासात 14 कॉल…, पोर्शे कार प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरवर असा आणला दबाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Porsche Car Accident | पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलच्या अदला-बदली प्रकरणाचा (Swapping Blood Sample) तपास सध्या सुरू आहे. तीन सदस्यीय कमिटीने मंगळवारी ससून जनरल हॉस्पिटलला (Sassoon Hospital) भेट दिली. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.

चौकशी दरम्यान समजले की, आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे (Dr Ajay Taware) आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) यांच्यात व्हॉट्सअप (Whats App Call) आणि फेसटाईमवर चौदा कॉल (Facetime) आणि एक साधा कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी ८:३० ते १०:४० च्या दरम्यान करण्यात आले होते आणि सकाळी ११ वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.(Pune Porsche Car Accident Case)

पोलिसांनी १९ मे रोजी झालेले अपघाताच्या दुसऱ्या दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे संकेत दिले होते. खाजगी रुग्णालयात डीएनएसाठी (DNA Test) घेतलेले ब्लड सॅम्पल आणि ससूनमधील ब्लड सॅम्पल न जुळल्याने हे प्रकरण उघड झाले होते.

यानंतर ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तवारे,
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Sharihari Halnor) आणि कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना
अटक करण्यात आली होती. या तिघांवर आरोप आहे की, त्यांनी लाच घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले होते,
जेणेकरून कार चालक अल्पवयीन आरोपीने दारू प्यायली असल्याचे उघड होणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Hit & Run Case | ‘हिट अँड रन’ प्रकरणात एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, त्यावेळी आरोपींच्यासोबत कारमध्ये एक मुलगी होती

PMC Action On Rooftop Hotel In Mohammed Wadi | महंमदवाडीतील बेकायदा रुफटॉप हॉटेल पाडले

Ujani Dam | पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरण परिसरातील नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : मुलगी 15 फूट हवेत उडाली, आरोपी नशेत; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम