Pune Porsche Car Accident Case | अपघाताचा छडा लावण्यासाठी ‘एआय’ द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार; पुणे पोलिसांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Porsche Car Accident Case | कल्याणीनगर येथील घडलेल्या अपघात प्रकरणी (Kalyani Nagar Accident) मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. या अपघात प्रकरणी आतापर्यंत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . बिल्डर विशाल अगरवालच्या (Builder Vishal Agarwal) वकिलांनी पोर्शे कारमध्ये समस्या होती, असा दावा कोर्टात केला होता. याची तक्रारही कंपनीकडे केलेली आहे, असाही युक्तीवाद त्यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर पोर्शेची टीम पुण्यात (Porsche Team In Pune) दाखल झाली. या प्रकरणात पोर्शे कंपनीचे तंत्रज्ञ आरटीओ (Pune RTO Officers) सोबत कार ची तपासणी करीत आहे. यामुळे हा दावाही खरा की खोटा हे ठरविण्यास मदत मिळणार आहे.(Pune Porsche Car Accident Case)

यामध्ये बिल्डर मुलाने अपघात केला तेव्हाचा कारचा असलेला वेग, वेळ, कितीवेळा कार हार्ड ब्रेकिंग करण्यात आली,
कितीवेळा वेगाने चालविण्यात आली याचा डेटा या आरटीओला दिला जाणार आहे. तसेच कारमध्ये इनबिल्ट डॅशकॅम होते.
त्याचेही रेकॉर्डिंग मिळविण्यात आले आहे. या सर्व माहितीचा वापर बिल्डर मुलाविरोधातील भक्कम पुराव्यांसाठी केला जाणार आहे.

याचबरोबर आता पुणे पोलीस या सगळ्या अपघाताची माहिती मिळवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
पुणे पोलीस ‘एआय’द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार आहे. ‘एआय’द्वारे अपघाताची घटना जिवंत करण्यात येणार आहे.
पुणे पोलीस (Pune Police) या प्रकरणात डिजीटल पुराव्यांवर (Digital Evidence In Pune Porsche Accident)
भर देताना दिसत आहेत . यासाठी हे पुरावे गोळा करणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Porsche Car Accident Case | रक्त तपासणीपूर्वी डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीच्या वडीलांमध्ये नेमकं काय झालं?

Pune Porsche Car Accident Case | 2 तासात 14 कॉल…, पोर्शे कार प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरवर असा आणला दबाव