Pune Porsche Car Accident-Excise Department Meeting | पुणे अपघात प्रकरणावरून सरकार आक्रमक पावित्र्यात; उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Porsche Car Accident-Excise Department Meeting | कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून (Kalyani Nagar Accident) पुण्यातील अनाधिकृत पब ,बारचा (Pubs & Bars In Pune) मुद्दा पुन्हा चर्चेत आला. पोलीस, महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता त्याबाबत कारवाईचा धडाका सुरु आहे.

पुण्यातील अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईमध्येही अशाप्रकारची कारवाई करण्यात आली. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. पावनगड बंगल्यावर आयुक्त कार्यालयातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडतेय. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येत आहे.(Pune Porsche Car Accident-Excise Department Meeting)

मागच्या दोन दिवसांपूर्वी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात जात
अनधिकृत पब, बार याबाबतची यादी वाचत विभागातील अधिकारी हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
त्यानंतर आता ही बैठक पार पडत आहे.

या संबंधित विभागाकडून आता नाईट लाइफ (Pune Night Life) संदर्भात नवीन नियमावली आणण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक्साईज विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुद्धा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Shrihari Halnor On Dr Ajay Taware | डॉ. अजय तावरेंच्या दबावामुळेच रक्ताचे नमुने बदलल्याचा डॉ. श्रीहरी हळनोरचा खुलासा

Hinjewadi IT Company | हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचे स्थलांतर; शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज

Hamare Baarah | ‘हमारे बारह’ चित्रपटावर वाद, अभिनेत्याला ठार मारण्याची धमकी, अन्नू कपूर म्हणाले – आधी पहा तर…