Coronavirus : पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रूग्ण, संख्या 16 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात आणखी एका कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. आता पुण्यात एकूण 16 रूग्ण झाले आहेत. सध्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.


देशातील संख्या 108 वर गेली असून त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. कोरोनापासून खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाने यापुर्वीच केले आहे. 31 मार्चपर्यंत सर्वच शाळा बंद ठेवण्याचा देखील निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे.