Pune : विमा संरक्षण बाबत पुणे महापालिकेत सल्लागार नेमणूकीची प्रक्रिया स्थगित द्या : दिपाली धुमाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेत विविध कामांसाठी सल्लागार नेमण्यात येथून सल्लागाराकडून मनपाचे हित बघण्याऐवजी ठेकेदार कंपनीचे हित बघितल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुणे महापालिकेकडे सक्षम अधिकारी असूनही सल्लागार नेमणूक करणे पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारे आहे.त्यामुळे सदर प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या विषयी आधिक माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या कि, आरोग्य विभागाकडे विमा संरक्षण बाबत मार्गदर्शन / सल्ला देणेकरिता सेवा देणारे सल्लागार नेमण्यासाठी स्वारस्य प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत यामध्ये माहिती घेतली असता सदर सल्लागार हे पुणे महापालिकेस मोफत सल्ला देण्यात येणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वास्तविक पुणे महापालिकेस मोफत सल्ला देणार म्हणजेच सदर सल्लागार त्यांच्या कंपन्यांना कंत्राट मिळविण्याच्या हेतूने सर्व प्रक्रिया करणार. या स्वारस्य प्रस्ताव मागविण्यामागे विशिष्ट कंपनी काम करीत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यापूर्वी कोटयावधी रूपयांची रक्कम सल्ल्यापोटी विविध कंपन्यांनी घेतली असून याकामामधून पुणे महापालिकेचे नुकसानच झाल्याचा अनुभव आहे.

यापूर्वी आम्ही पुणे महापालिकेने महात्मा फुले जन आरोग्या योजना स्विकारली असून त्यापोटी शासनाकडून रक्कम मिळाल्याची कबुली दिली आहे. तसेच प्रशासनाने याप्रकरणी स्वतःची पाठ देखील थोपटून घेतली होती. कोरोनाने शहरात प्रवेश केल्यानंतर पुणे महापालिकेच्या यंत्रणेवर शहरात सर्व ठिकाणी रूग्णांवर उपचार करण्यात आले. महापालिकेचे रूग्णालया सक्षम करणे, डॉक्टर्स व इतर आवश्यक भरती करणे. तसेच शहरी गरीब योजना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरू झाली असून या योजनेमुळे शहरातील गरजू गरीब नागरिक त्याचा लाभ घेत असून ही योजना काही खाजगी कंपन्यांच्या हितसाठी बंद करण्याचा डाव साधला जात आहे. प्रशासनास कोणतेही नवीन धोरण आणावयाचे असल्यास त्यास मुख्य सभा व स्थायी समिती यांची मान्यता घेणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून मुख्य सभा व स्थायी समिती यांची कोणतीही परवानगी न घेता परस्परपणे सदर प्रकरणी खाजगीकरणाची कार्यवाही चालू केली असून सदर बेकायदेशीर प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यात यावी. अन्यथा आंदोलना चा इशारा दिपाली प्रदीप धुमाळ यांनी दिला आहे.