Pune : ‘त्या’ कंपनीकडून घेतलेलं खाद्य दिल्यानंतर कोंबडया अंडी देत नाहीत, पोल्ट्री चालकाची पोलिस ठाण्यात धाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक अचंबित करणारा आगळावेगळा प्रकार समोर आला असून, कोंबड्या अंडे देत नसल्याने पोल्ट्री चालकाने पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी देखील तक्रार दाखल करत याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका कंपनीकडून कोंबड्यांसाठी खाद्य खरेदी केले होते. ते खाद्य खाल्ले यानंतर कोंबड्या अंडे देत नसल्याचे म्हंटले आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोल्ट्री चालक लक्ष्मण भोंडवे यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबा येथे राहतात. लक्ष्मण भोंडवे यांच्यासह काही पोल्ट्री चालकांनी आठ दिवसांपूर्वी एका कंपनीकडून कोंबड्यांसाठी खाद्य घेतले होते. हे खाद्य खाल्ल्यानंतर कोंबड्यानी अंडे देणे बंद केले असे या चालकांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

याबाबत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले की, एका कंपनीकडून खरेदी केलेले खाद्य खाल्ल्यानंतर कोंबड्या अंडे देत नसल्याची तक्रार घेऊन काही पोल्ट्री चालक आमच्याकडे आले होते. आम्ही चौकशी सुरू केली असून, पशुधन आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोललो आहोत. संबंधित कंपनीसोबत बोलून संबधित पोल्ट्री धारकांना मदत देण्यासाठी सांगणार आहोत. कंपनीने मदत देण्यास नकार दिला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.