Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापारेषणकडून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर वीजवाहिन्यांसाठी (Pune Power Supply Off) नवीन मनोरे उभारणीचे काम सुरू आहे. या कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम रविवारी (4 डिसेंबर) सकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे. त्यामुळे या कालावधीत शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात वीजपुरवठा (Pune Power Supply Off) बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

महापारेषण कंपनीच्या गणेशखिंड ते चिंचवड, गणेशखिंड ते रहाटणी या अतिउच्च दाब 132 केव्ही वीज वाहिन्यांचे मनोरे आणि तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तो दूर करण्यासाठी नवीन मोनोपोल टॉवर उभारण्याचे पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण झाले. यातील उर्वरित काम रविवारी पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी गुरुवारीदेखील शहराच्या काही भागातील वीजपुरवठा (Pune Power Supply Off) खंडित केला होता.

फर्ग्युसन कॉलेज रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग 1, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर,
लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, वेताळबाबा चौक, राजभवन, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण,
काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मंगला टॉकीज, आयआयटीएम,
कॅसल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफिस,
सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पिटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, चित्रशाळा,
आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज आणि गणेशवाडी परिसरात दोन तास वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title :- Pune Power Supply Off | power supply in shivajinagar and deccan areas off for two hours on sunday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वॉटर प्युरिफायर मटेरियल परस्पर विकून कंपनीची 48 लाखांची फसवणूक; वाघोली येथील प्रकार

COEP Cource Closed | सीओईपीचा रेल्वे-मेट्रो अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात?