Pune Private Trains | दिल्ली, भोपाळ, पाटणा, हावडा, दिब्रूगड आणि प्रयागराज या 6 शहरात पुण्यातून खासगी रेल्वे धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Private Trains | नुकतंच देशाचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitaram) यांनी नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाईन (National Monetization Pipeline) अर्थात राष्ट्रीय मुद्रीकरण स्पष्टीकरण (MNP) जारी केलं आहे. तर यावरून वेगवेगळ्या क्षेत्रातील असणाऱ्या शासकीय मालमत्तामधील भागीदारीची विक्री करून अथवा भाड्याने देऊ करून केंद्राकडून तब्बल सहा लाख कोटी (Six lakh crore) रुपये उभे केलं जाणार आहे. यामधीलच साधारण 1.2 लाख कोटी रुपये हे रेल्वेच्या खासगीकरणातून उभं केलं जाणार आहे. यामध्ये रेल्वे क्षेत्रातील (Railway area) विविध बाबी खासगीकरण (Privatization) केले जाणार आहे. यामध्ये समाविष्ट होणाऱ्या 90 प्रवासी रेल्वे पैकी 6 रेल्वे पुणे स्टेशनवरून (Pune Private Trains) सुटणार आहेत.

देशातील 400 रेल्वे स्थानके, 90 प्रवासी रेल्वे गाड्या, 15 रेल्वे मैदाने आणि 265 मालधक्के भाड्याने देण्यात येणार आहे. यामधील खासगी होणाऱ्या 90 प्रवासी रेल्वे पैकी पुण्यातील 6 गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये दिल्ली (Delhi), भोपाळ (Bhopal) , पाटणा (Patna), हावडा (Hawada), दिब्रूगड (Dibrugarh) आणि प्रयागराज (Prayagraj) अशा 6 गाड्या पुण्यातून (Pune ) सुटणार आहेत. या गाड्या खासगी होणार आहेत. याबाबत प्रक्रिया लवकरच सुरु होईल. या अगोदर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने (Union Ministry of Railways) मार्गांचे व्यवस्थापन केले आहे. यावरून रेल्वेने 12 क्लस्टर जारी केलं तसेच, संबंधित रेल्वे गाड्यांचे टाईमटेबल देखील जारी केलं आहे. या समाविष्ट केलेल्या गाड्यामध्ये प्रवास जास्त आराम, स्वच्छ आणि आलिशान असणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र यासाठी तिकीट दर अधिक असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे स्टेशनवरून (Pune station) सुटणाऱ्या ज्या 6 रेल्वे मार्गांची निवड केलीय. यामध्ये दिल्ली आणि हावडासाठी सर्वाधिक ‘वेटिंग’ असते. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जादा प्रवासी मिळून उत्पन्न वाढेल या आशेने खासगीकरणासाठी या मार्गांची निवड केलीय. दरम्यान, भारतीय रेल्वेच्या 30 मिनिटपूर्वी खासगी रेल्वे सुटणार आहे. आणि त्याची गती अधिक असणार आहे. मुख्यतः म्हणजे पुण्यातून दिब्रूगड या मार्गावर तर पहिल्यांदाच थेट रेल्वे धावणार आहे.

                       

खासगीत समावेश झालेल्या रेल्वे गाड्या – (पुणे स्थानकावरून)

 

  • पुणे ते दिल्ली (Pune to Delhi) : पुण्याहून रोज संध्याकाळी 6 वाजता-दिल्लीला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता पोहचणार. दिल्लीतून 3 वाजून 20 मिनिट, पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता.

 

  •  पुणे ते भोपाळ (Pune to Bhopal) : आठवड्यातून 3 दिवस धावेल.
    सोमवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी पुण्यातून निघेल, दुसऱ्या दिवशी पहाटे 4.15 वाजता भोपाळला पोहचणार, ‘बुधवार,
    रविवार आणि शुक्रवारी भोपाळहून सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी निघेल, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी पुण्यात पोहचणार.

 

  • पुणे ते पाटणा (Pune to Patna) : आठवड्यातून 2 दिवस धावेल. पुण्याहून सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजता पाटण्याला पोहोचेल. पाटण्याहून रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी निघेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी पहाटे 5.15 वाजता पोहोचेल.

 

  • पुणे ते हावडा (Pune to Hawada) : आठवड्यातून 2 दिवस धावेल.
    पुण्यातून गुरुवारी व रविवारी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी निघेल.
    दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता हावडा येथे पोहोचेल. हावडा येथून मंगळवारी,
    शुक्रवारी सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

 

  • पुणे ते प्रयागराज (Pune to Prayagraj) : आठवड्यातून 3 दिवस धावेल.
    पुण्यातून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी निघेल.
    प्रयगराजला दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता पोहोचेल.
    प्रयागराज स्थानकावरून दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता पोहचेल.

 

पुणे ते दिब्रूगड (आसाम) (Pune to Dibrugarh (Assam) : आठवड्यातून 1 वेळ धावेल.
पुण्यातून दर रविवारी सकाळी 10.30 वाजता निघून दिब्रूगडला बुधवारी सकाळी 5.30 वाजता पोहोचेल.
दिब्रूगडगून बुधवारी सकाळी 9.45 वाजता सुटून 2 दिवसांनी पहाटे 4.30 वाजता पुण्यात पोहोचेल.

Web Title : Pune Private Trains | passengers-are happy private trains pune 6 cities including delhi kolkata patna bhopal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे,
केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती,
जाणून घ्या कसे

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’