Pune : पुण्यात डीपीची मुख्य वायर हातात पकडून प्राध्यापकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केरळमधील एका प्राध्यापकाने विजेच्या डीपीची मुख्य वायर हातात पकडून पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विधि महाविद्यालय रस्त्यावर गुरुवारी (दि. 15) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

किरण राजकुमार (वय 32 , रा. त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे झालेल्याचे नाव आहे. ते केरळमधील आर्किटेक्चर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्य़रत होते. हे त्यांच्याजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून समजले आहे. त्या ठिकाणी फोन केला असता सहा महिन्यांपासून त्यांची वर्तणूक ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. ते पुण्यात कसे आले हे माहिती नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हा व्यक्ती दुपारी रागाच्या भरात काहीतरी बडबडतच येत होते. त्यांनी डीपी उघडला आणि त्यातली वायर त्यांनी हातात घेतली. पायात बूट असल्यामुळे ते भाजले नसावेत असा अंदाज आहे. मात्र जबरदस्त शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मोबाइलमध्ये शोध घेतला असता त्यांनी शेवटचा कॉल हा वडिलांना केल्याचे दिसल्याचे तपास अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितले.