मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अनोखा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग देशभर मतदानाबाबत जन जागृतीसाठी मोहीम राबवली आहे जात आहे. त्याच मोहिमेला साद देत पुण्यातील नाना पेठ येथील सीट कव्हर आणि एक्सेरीसमध्ये सुप्रसिद्ध असलेले नाव म्हणजे ‘शंकरराव पवार सीट कॉर्नर’ यांच्या वतीने अमर पवार व राजेश पवार यांनी ‘जास्तीत जास्त संख्येने मतदान करा’ असं आव्हान मतदारांना केलं केले आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यास शंकरराव पवार सीट कॉर्नरमध्ये सीट कव्हर आणि एक्सेरीसवर २० टक्के सूट दिली जाणार आहे. ज्या नागरिकांनी मतदान केले आहे. त्यांनी बोटावरील निळी शाई दाखवून या योजनेचा फायदा घेवू शकतात. या उपक्रमात मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी पवार बंधू म्हणाले कि मतदान हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे. तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. मतदान करणे आपले परम कर्तव्य असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे. देश हिताच्या कार्यात सहभागी नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आहे. नागरिकांनी मतदान करावे व आमच्या दुकानातील वस्तूंवर २० टक्के भरघोस अशी सूट मिळवी. तरी पुणेकरांनी जास्तीजास्त प्रमाणात मतदानाचा हक्क बजावावा असे पवार बंधू यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

visit : Policenama.com

 

You might also like