पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्क परिसरात स्पाच्या नावाखाली सुरू असणार्‍या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. येथून तीन महिलांची सुटका करत एकाला अटक केली आहे.

जितेंद्र विजय रणदिवे ( वय 36, रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी गल्लीतील जॉयस स्पा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक श्रीधर फडके, माने, पठाण, पुकाळे, केकाण व संतोष भांडवलकर यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी तीन महिला वेश्याव्यवसायासाठी त्या ठिकाणी असल्याचे आढळून आले. त्यांची सुटका करण्यात आली. आरोपी रणदिवे हा महिलांकडून स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे.