राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मनसेचे जोडे मारो आंदोलन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
आमदार राम कदम यांचे दहीहंडीच्या कार्यक्रमातील अपहरणाचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीकास्त्र सुरू झाले. सोशल मीडिया तसेच समाजातील सर्वच स्तरातून  त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या  बेताल वक्तव्याविरोधात शहर मनसे महिला सेनेकडून “जाेडे माराे” अांदाेलन  करण्यात आले.
मनसे महिला सेनेच्या वतीने अलका चाैकात निदर्शने करण्यात अाली. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारण्यात अाले. मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठाेबरे यांच्या नेतृत्वाखाली हे अांदाेलन करण्यात अाले.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’653968d2-b0f4-11e8-8a19-d3348fa8d3f8′]
यावेळी रुपाली पाटील- ठाेंबरे म्हणाल्या, राम कदमांना सत्तेचा माज अालेला अाहे. त्यांना महिलांबद्दल कुठलाही अादर राहिलेला नाही. त्यांचं वक्तव्य हे महिलांचे अपमान करणारे अाहे. त्यामुळे अाम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारले अाहेत. राज राहेबांनी अाम्हाला परवानगी दिली तर अामची एक महिला कार्यकर्ती घाटकाेपरमध्ये जाऊन त्यांना स्त्री शक्ती दाखवून देईल.
दहिहंडी उत्सवाच्या गर्दीसमोर भाजपचे आ. राम कदम यांनी जोशात येऊन वादग्रस्त वक्तव्य केले होते . तुम्हाला एखादी मुलगी अावडली तिने तुम्हाला नकार दिला अाणि जर तुमच्या घरच्यांना ती मुलगी पसंद असेल तर तिला उचलून अाणू असे  वक्तव्य राम कदम यांनी मुंबईतील घाटकाेपर येथील दहीहांडी साेहळ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना संबाेधताना केले हाेते.