×
Homeताज्या बातम्यापुण्यातील प्रभाग क्रमांक 1 पाणीपुरवठा प्रश्नावर 'आंदोलन'

पुण्यातील प्रभाग क्रमांक 1 पाणीपुरवठा प्रश्नावर ‘आंदोलन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सततच्या पाणी प्रश्नाला कंटाळून नगरसेवक अनिल टिंगरे यांनी आज स्वत: विद्यानगर पंपिंग स्टेशनच्या विद्यानगर,  टिंगरेनगर, कळस, विमाननगर, धानोरी सर्वच भागाच्या पाणी पुरवठा मोटर बंद करून पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा निषेध नोंदविला आहे .नेहमी संयमी असलेले अनिल बाॅबीदादा टिंगरे हे आज संतापले होते.वारंवार बैठका घेऊन देखील पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून कलवड खेसेपार्क लोहगाव या भागाला पाण्याच्या बाबतीत न्याय मिळत नसल्याने आज पाणीपुरवठा मोटर बंद करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी धानोरी ,मुंजाबावस्ती ,भैरवनगर, कलवड,खेसेपार्क , लोहगाव भागातील गंभीर असलेल्या पाणी समस्येवर अधिकाऱ्यांना धारेवर धरून उपाययोजना विचारण्यात आली .पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या समक्षात निषेध व्यक्त करण्यात आला.नगरसेवकांनी आंदोलन करताना सर्वच भागातील पाणीपुरवठा बंद केला होता.पुणे मनपा अधिकाऱ्यांनी योग्य उपाययोजना करण्याची हमी दिल्यानंतर नागरिकांना त्रासदायक होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेण्यात आले.

व पुन्हा पाणीपुरवठा मोटर चालू करण्यात आल्या. नगरसेवक अनिल बॉबी टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मारुती सांगडे, नगरसेविका ऐशवर्या जाधव, वृक्ष प्राधिकरण सभासद धनंजय जाधव ,भाजपा वडगांव शेरी अध्यक्ष संतोष खांदवे, मोहनराव शिंदे, आशुतोष जाधव, अर्जुनभैय्या जगताप, अविनाश सकुंडे, गोपाळ पाटील, लिंगू साखरे, शैलेश रणवरे, प्रकाश सुतार, दिलीप जाधव, कुणाल गरसुंद, सर्फराज सय्यद, अब्दुल शेख, फैयाज शेख, लतीफ, आझम अन्सारी, श्रीनिवास, इरफान सय्यद यांसह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. तर प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उप अभियंता एकनाथ गाडेकर, कनिष्ठ अभियंता मधुकर थोरात, दत्तात्रय तांबारे उपस्थित होते.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News