…म्हणून पुण्यातील मूकबधिरांचं आंदोलन अखेर मागे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात सुरू असलेलं मूकबधिरांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे कारण मूकबधिर आंदोलकांच्या मागण्यांवर सहमती झाल्याचे समजत आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी निवेदन सादर केले. यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे समजत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागातून अनेक मूकबधिर एकत्र येत त्यांनी पु्ण्यातील कल्याण आयुक्तालयासमोर आंदोनलनाला बसले होते. दरम्यान शांततेत सुरू असलेल्या या मूकबधिर आंदोलकांवर काल (सोमवार दि- 25) पोलिसांनी लाठीचार्ज करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या लाठीचार्जनंतर सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता.

खालील मागण्यांवर सहमती
मूकबधिरांच्या उच्च शिक्षणासाठी पाच विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आले आहेत. लातूर, नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.

सामान्य शासकीय शाळांमध्ये सांकेतिक भाषातज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधे सांकेतिक भाषातज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल हेही आश्वासन देण्यात आलं आहे.

सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पात्र ठरवलेल्या मूकबधिरांना वाहन चालक परवाना देण्यात येईल. शासकीय नोकरीत मूकबधिर प्रवर्गात नियुक्त झालेल्या उमेदवारांची तपासणी करण्यासंदर्भात आठ दिवसांत परिपत्रक काढण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, येत्या 28 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत कर्णबधिर असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. इतकेच नाही तर, आंदोलकांच्या उर्वरीत मागण्यांवर अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच 8 दिवसांत निर्णय घेण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले आहे.