पाकिस्तानमधील ‘गुरुद्वारा’वरील ‘भ्याड’ हल्ल्याचा पुण्यात निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानच्या नानकाना साहिब गुरुद्वारावर जमावाने शुक्रवारी केलेला हल्ला आणि तेथील भाविकांवर केलेली दगडफेक यांचा निषेध करण्यासाठी आज (रविवार) पुण्यातील कसबा विभाग पतित पावन व शिख समाज यांच्यातर्फे गणेश पेठ गुरुद्वाराबाहेर पाकिस्तानचा झेंडा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रतिकात्मक फोटोंना पायदळी तुडवून जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी धर्म माणसाला नैतिकतेचे धडे शिकवते, मोदी जी तुम आगे बढो, ईट का जवाब पत्थर से दो, हिंदू शिख भाई भाई, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. पतित पावन तर्फे स्वप्नील नाईक यांनी शिख बांधवांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जे शिख बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या बद्दल कृतध्नता व्यक्त केली. चरणजीतसिंग सहानी यांनी शिख बंधवांवर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आपले मत व्यक्त केले.

वंदे मातरमने निदर्शनाची सांगता झाली.  त्यावेळी धनंजय लेले, मनोज नायर, दिनेश भिलारे, नीलेश जोशी, योगेश वाडेकर, मनोज पवार, विश्वास मनेरे, यादव पुजारी, मायकल प्लंजर, बाळा कांबळे, संतोष गुरू, स्वानंद माने यांच्यासह शिख बांधव उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/