पुण्यात ‘या’ तारखेला साडेपाच लाखांहून जास्त बालकांना देण्यात येणार ‘पोलिओ डोस’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – १९ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यात सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. पुण्यासह जिल्ह्यात एकूण ५ लाख ६८ हजार ८३० बालकांना ही प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. ही लस पाच वर्षाच्या आतील बालकांना देण्यात येत असते.

दरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ७ जानेवारीला मंगळवारी या मोहीमेचा संपूर्ण आढावा घेतला आहे. या वेळी विविध अधिकारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, शल्यचिकित्सक डॉ. ए. बी. नांदापूरकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी राम म्हणाले की, ‘जर बुथवर लसीकरणासाठी बालके उपस्थित राहिली नाहीत तर अशा बालकांना नंतर पोलिओ लस देण्यात येईल.’

तसेच जिल्ह्यात एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. असून जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानके, खाजगी दवाखाने, धार्मिक स्थळे, बाजार, यात्रा येथील बूथ आणि मोबाईल पथकाद्वारे लसीकरण होणार आहे, अशी देखील माहिती त्यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/