Pune : पुणे बार असोसिएशनमधील ज्येष्ठ वकील विद्याधर कोशे यांचं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे बार असोसिएशनमधील ज्येष्ठ वकील विद्याधर कोशे (55) यांचं आज (शनिवार) पुण्यातील एका खासगी रूग्णालयात निधन झालं आहे. ते 55 वर्षाचे होते. गेल्या 30 वर्षा पेक्षा अधिक काळापासून ते पुण्यातील सत्र न्यायालयात वकीली करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वकिल घडले आहेत.

कोशे यांच्या निधनामुळं त्यांच्या कुटुंबासह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे कोशे हे क्रिमीनल लॉयर म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी अनेक खटले गाजवले. आज वयाच्या 55 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. अत्यंत शांत स्वभावाचे कोशे हे नेहमी ज्यूनीयरला मार्गदर्शन करत होते. त्यांना पोलीसनामा ऑनलाइनकडून भावपुर्ण श्रध्दांजली.