Pune News : शहर वाहतूक शाखेत अनेक कारनामे करणार्‍या ‘त्या’ कर्मचार्‍याची उचलबांगडी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागात नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “अजया”वर विजय मिळववा अस म्हंटल जात, पण पुणे शहर वाहतूक विभागात एका पोलीस कर्मचाऱ्यांनेच विजयावर “अजय” मिळवला अन् अल्पवावधीत तो येथील “सेकंड डीसीपी” म्हणून ओळखला गेला. त्याला आता आपण अख्ख “राण” हणल्याचा भास झाला अन् तो आव आणत वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच भारी होऊ लागला. सर्वांना बेजार करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कुंडली मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजली अन् त्यांनी दोन दिवसापूर्वी शेवटच्या क्षणी त्याची रवानगणी महापालिका विभागात केली. त्यामुळे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी ते कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पण त्याला इतकी मोकळीक मिळाली किंवा दिली कशी असा प्रश्न आता सर्वजण चर्चित आहेत.

पुणे पोलीस दलातील वाहतूक विभाग वेगवेगळ्या प्रकारे सतत चर्चेत असतो. कधी कारवाईने तर कधी टोळके उभे करत होणार दंड. गेल्या दोन वर्षात तर पुणेकर या कारवाईने बेजार झाले होते. 100 कोटींहून अधिक दंड केला गेला. आता मास्कची कारवाई. पण सध्या गाजत आहे, तो वाहतूक शाखेचा “सेकंड डीसीपी”चा विषय. बर या सेकंड डीसीपीचे दोन ते तीन महिन्यात इतके कारनामे की त्याला सर्वच वैतागले. एका सहाय्यक आयुक्तांनी तर त्याच्या बाबत स्पष्ट नाराज व्यक्त केली. पण आता वरिष्ठ त्याचे ऐकतात म्हणल्यावर आपण काय करणार, असेही ते बोलून गेले.

तत्पुर्वी पूर्वी वाहतूक विभागात आणि आता गुन्हे शाखेत असणाऱ्या सहाय्यक आयुक्तांनी त्याला चांगलाच धारेवर धरला होता. त्याची उचल बांगडीची देखील तयारी झाली होती. पण अचानक त्यांचीच गुन्हे शाखेत बदली झाली. यानंतर मात्र तो सेकंड डीसीपी पूर्ण “राण” हाणल्यागत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या इतक्या जवळ गेला की, त्याचीच वाहतूक विभागात चलती झाली. नवीन आलेल्या एका सहाय्यक आयुक्तांनी हा प्रकार पाहिल्यानंतर डोक्याला हात लावलाच पण त्याच सर्व पाहून हैराण देखील झाल्या. त्यांचा वैताग इतका झाला की त्यांनी ही नाराजी इतर अधिकाऱ्यांसोबत बोलून देखील दाखवली. दरम्यान या राण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक कहाण्या आता समोर येत आहेत. ड्युटीवर नसलेले कर्मचारी कंट्रोलला घेणे आणि त्यांच्याकडून तोडपाणी करून त्यांना पुन्हा त्याच किंवा पाहिजे तेथे पाठवणे असेही तो करत असल्याची चर्चा वाहतूक विभागात आहेत. “वाढीव” माल मिळवण्यासाठी त्याने अनेक कारनामे केल्याचे ऐकायला येते.

दरम्यान हा प्रकार अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेला. त्यांनी लागलीच त्याची उचल बांगडी केली आणि त्याला मनपा अतिक्रमणला धाडले. पण त्याला ऑर्डर बाहेर पडण्यापूर्वी आपली उचल बांगडी झाल्याचे समजले. मग मात्र त्याने लागलीच थेट 45 दिवसांची सुट्टी घेतली. मनाविरुद्ध ऑर्डरनंतर झाल्यानंतर सुट्टीवर जाणे हा जुनाच पायंडा. पण त्याला लागलीच 45 दिवसांची इमर्जन्सी सुट्टी कशी मिळाली, अशी चर्चा आता वाहतूक शाखेत केली जात आहे.