Pune Crime News | कोंढवे-धावडे परिसरात तरूणाला बेदम मारहाण, पोलिसांकडून 5 जणांचा अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गाडीचा कट मारल्यावरून एका तरुणाला बेदम मारहाण (Pune Crime) करत त्याच्या घरात शिरून टोळक्याने राडा घातल्याची घटना घडली आहे. कोंढवे-धावडे (kondhawe dhawade) भागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी धीरज गणेश धावडे (वय 21), भूषण तानाजी धावडे (वय 28), कुणाल किरण धावडे (वय 22), संकेत तानाजी धावडे (वय 25) व चिराग भगवान धावडे (वय 19, रा. सर्व रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत वैशाली धावडे (वय 55) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) तक्रार (Pune Crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व एकाच भागातील आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांचा मुलगा रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून येथील विष्णू नारायण कॉम्प्लेक्स समोरून जात होता. त्यावेळी धीरज धावडे याने कट मारल्यावरून वाद घातला. या दोघांचे भाडन सुरू असताना आरोपी एकत्र जमले व त्यांनी अभिजितला शिवीगाळ केली. त्यानंतर हातात कोयते आणि लाकडी स्टिक घेत फिर्यादी यांच्या प्लॉटचा संरक्षण दरवाजा तोडून मुख्य दरवाजातून आत प्रवेश करत कुटुंबाला शिवीगाळ करत मोठा धिंगाणा घातला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत या 5 जणांना अटक केली आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस (Uttamnagar Police) करत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | आज 7921 रुपयांनी सोनं स्वस्त, स्वस्त सोनं खरेदीची उद्यापर्यंत संधी, जाणून घ्या आजचे बाजारभाव

MLA Madhukar Thakur | माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime News | Police beat up youth in Kondhve-Dhavade area, arrest 5

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update