ATM मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणार्‍या खडक पोलिसांकडून 12 तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रभूषण चौकात स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास खडक पोलिसांनी १२ तासात अटक केली. अमित रवींद्र भाग्यवंत (वय ३५, रा. आंबेडकरनगर, दापोडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुयोग महादेव परमाळे (वय ३७, रा. धनकवडी ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रभूषण चौकातले एटीएम मशीन फोडून चोरी करणारा नातूबाग मैदानावर थांबल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमितला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक निरीक्षक सुशील बोबडे, अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, रवी लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.