वर्षभरापासून पसार असणार्‍या सराईताला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईतला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तो फरासखाना पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार होता.

सूरज अशोक ठोंबरे (रा. नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस काम करत आहेत. तर जामिनावर बाहेर आलेल्यांवर लक्ष ठेवले जात आहे. या दरम्यान समर्थ पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी समर्थ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज ठोंबरे हा दिसून आला. त्याला पकडून विचारपूस केली असता तो फरासखाना पोलीस ठाण्याच्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे, पोलीस हवालदार संतोष काळे, सुमित खुट्टे, सुशील लोणकर, राजस शेख, प्रमोद टिळेकर यांच्या पथकाने केली.