पुण्यातील संगमघाट परिसरातील खून प्रकरणाचा पर्दाफाश, दोघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बंडगार्डन परिसरातील संगमघाट येथील तरुणाच्या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले असून, किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

निखील उर्फ भैय्या दिगंबर कांबळे आणि प्रदीप उर्फ गोट्या गोरख कटारनवरे (वय २५, दोघेही रा. ताडीवाला रस्ता ) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. मंगेश विष्णू कांबळे (वय 25) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओ चौकाजवळ संगम घाट पार्किंगमध्ये बुधवारी सकाळी मंगेशचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी तपास केला असता, किरकोळ कारणावरून मंगेश आणि दोघांची भांडणे झाली होती.

त्यामुळे खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसानी निखील आणि प्रदीपला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मंगेशचा खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरीष्ठ पोलीस कामगिरी श्रीकांत शिंदे, दिगंबर शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप जमदाडे यांच्या पथकाने केली.