Lockdown : पुणे पोलिसांमुळं मोठा अनर्थ टळला अन्यथा मुंबई बांद्रा ‘रिपीट’ झालं असतं

पुणे :  पोलिसनामा ऑनलाइन –  रेल्वे सुटणार या अफवा पसरल्याने बांदऱ्यात घडलेलं प्रकरण पुण्यातही घडलं असत. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मध्यप्रदेश येथील 100 ते 125 कामगार पहाटेच चालत गावी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना कात्रज भागात अडवून त्यांची समजूत काढली आणि पुन्हा घरी पाठविल्याचा प्रकार घडला.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मे परियंत वाढविले आहे. त्यामुळे शहरा शहरात अडकलेले नागरिक, कामगार आपआपल्या घरी जाण्यासाठी वाट्टेल तो मार्ग स्वीकारात आहेत. मात्र जिल्हाबंदी आणि राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईनंतर परराज्यातील आणि जिल्ह्यातील अनेक कामगार व नागरिक पुण्यात आहेत. हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे जो-तो गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे.

बांदऱ्यात कालच परराज्यात जाण्यास तुफान गर्दी रेल्वे स्थानक भागात झाली होती. त्यातून मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांना लाठीमारकरून ही गर्दी कमी करावी लागली. अफवा पसरल्याने हा प्रकार घडल्याने दोघांना अटक केली आहे. तर 1000 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात देखील असाच काहीसा प्रकार घडला असता अशीच म्हणायची वेळ आली आहे. परंतु पोलिसांनी हा प्रकार जागीच थांबवला. शहरातील भारती विद्यापीठ भागात राहणारे कामगार त्यांच्या मध्यप्रदेशातील मूळगावी परतण्याचा प्रयत्न करत होते. हे मजुर पहाटे

पायी चालत निघाले होते. 100 ते 125 कामगार होते.

पोलिसांनी कात्रज भागात अडवले. त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी पाठवले.कात्रज भागातील अंजलीनगर येथे पहाटे १०० ते १२५ मजूर कुटुंबीयांबरोबर पायीपायी जात होते. पहाटे चारच्या सुमारास कात्रज परिसरात पोलिसांच्या पथकाने मजुरांना पाहिले. त्यांच्याकडे विचारणा केली. टाळेबंदी १४ एप्रिलपर्यंत उठली नाही. आम्हाला मूळगावी परतायचे आहे, अशी विनंती मजुरांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्यांची समजूत घातली आणि धीर दिला.‘तुम्ही आता घरी रहा, अशा परिस्थितीत घर सोडणे योग्य ठरणार नाही. तुमची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर मजूर आणि कुटुंबीय पुन्हा माघारी फिरले, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.