औषध खरेदी करणार्‍यांना ‘सर्दी’, ‘ताप’, ‘कोरडा खोकला’ व श्वसनास त्रास होतोय, मग मेडिकलवाल्यांनी पोलिस नियंत्रण कक्षास WhatsApp वर माहिती देण्याचे आदेश

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील सर्व मेडिकल दुकानदाराना सर्दी, ताप, खोकला, श्वसनास त्रास होत असल्याबाबत औषधे घेऊन जाणाऱ्या व्यक्तींची नावे पोलिसांना कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या मेडिकल चालकांनी पोलीसांच्या 8975953100 या व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवायची आहेत. माहिती न देणाऱ्या मेडिकल चालकावर कारवाई करण्यात येणार आहे, पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हे आदेश शनिवारी दुपारी दिले आहेत.

शहराची संख्या 40 लाखाहून अधिक आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनकरित्या वाढत आहे. अनेकजणांना लागण होत असून शहरात दिवसभरात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.कोरोना रुग्णांचा आकडा 516 च्यावर गेला आहे. त्यातही इतर शहराच्या तुलनेत पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. तर ही साखळी तोडणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टर व्यक्त करत आहेत. अन्यथा रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. ही साखळी तोडण्यासाठी ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लवकर शोधून त्याना योग्य उपचार तसेच माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना लवकर उपचार सुरू केले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांनाही धोका नसणार आहे. तसेच ज्यातून ही साखळी मोडली जाऊ शकते. त्यामुळे अश्या व्यक्तींनी तत्काळ रुग्णालयात धाव घेण्याची गरज आहे. किंवा स्वतः माहिती देण्याची गरज आहे.

तत्पूर्वी काही जण डॉक्टरांच्या परस्पर सर्दी, ताप, खोकला याच्या गोळ्या परस्पर मेडिकलमधुन घेऊन जात आहे. त्यामुळे लवकर या रुग्णाची माहिती मिळत नाही. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी शहरातील सर्व औषध विक्रेत्या दुकानदारांनी ज्या व्यक्ती डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय कोरोना संसर्ग सदृश्य लक्षणांसाठी औषधे खरेदी करणाऱ्यासाठी येथील अश्यांची नावे, मोबाईल क्रमांक तसेच राहता पत्ता याची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी महाराष्ट्र पो. अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे सर्व औषध दुकानदारांना निर्देश दिले आहेत. माहिती न देणाऱ्या दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. त्यांनी दिवसभर ग्राहक आलेल्यांची “कॉपी” (नोंदीचे वही) फोटो काढून पुणे पोलिसांचा व्हाट्सअप क्रमांक 8975953100 या नंबरवर पाठवायचा आहे.

—चौकट—

१)  सर्दी, ताप, कोरडा खोकला व श्वसनास त्रास होणे यासाठी लागू पडणाऱ्या औषधांची मागणी करणाऱ्या ग्राहकांच्या नोंदी ठेवा. त्यात नाव, पत्ता आणि संपर्क घेणे आवश्यक.

२)  विशेषकरून डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी नसल्यास त्याची नोंद प्राधान्याने करावी.

३) ही औषधे कोणासाठी घेतली जात आहेत, याची चौकशीकरून त्याची नोंद करावी .

४)  दिवसभर आलेल्या ग्रांहकाची नोंद असणाऱ्या वहिचे कॉपी दररोज 80 टक्के दिले आहेत.

5)  पोलिसांना कळविण्याबरोबरच संबंधीत मेडिकल चालकाने त्याचे नाव व इतर माहिती पोलिसांना द्यायची आहे.

6)  ग्राहकास चौकशीकरून त्यांच्या सांगण्यावरून त्या व्यक्ती कोरोना आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यांना पालिकेच्या फ्लू क्लिनिकमध्ये पाठवायचे आहे.

7)  कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतर ठेवावे.

८)  दुकानात गर्दी होणार नाही. सोशल डिस्टसिंग याचे पालन होईल हे पहावे.