काय सांगता ! होय, पुण्यात संचारबंदीत दुधाच्या टेम्पोत चक्क बिअरची वाहतूक, पोलिसांकडून ‘पर्दाफाश’

पुणे :  पोलिसनामा ऑनलाइन –   कात्रज परिसरात वाहतूक पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान दुधाच्या टेम्पोतून अवैधरित्या बिअरची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक उघडकीस आणला आहे. टेम्पोतून 12 बॉक्स पकडला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर राज्यात संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थपना बंद आहेत.

शहरात पुणे पोलिसांनी वाहने रस्त्यावर अण्यास बंदी घातली आहे. दरम्यान यात अत्यावश्यक सेवा देताना दूध, खायच्या वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू आहे. त्यांना पासेस देण्यात आले आहेत.

दरम्यान ठिकठिकाणी पोलीस गस्त घालत आहेत. रात्र गस्तही वाढविण्यात आली आहे. दरम्यान भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस 123 झुंजार कात्रज घाट येथे गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवलदार पारखी आणि पोलीस हवालदार तोंडे, पोलीस नाईक भिंगारे असताना दुधाचा टेम्पो (क्रमांक MH.12. JF. 6988)

संशय आला. यामुळे त्याला थांबविले. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्यांच्या बोलण्यावरून तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यात दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे लपवलेले 28 हजार 800 रुपयांचे बियरचे 12 बॉक्स दिसून आले. पोलिसांनी टेम्पो जप्तकरून भारती विद्यपीठ पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे.