पुणे पोलिसांची ‘रिक्षा सेवा’ आज बंद ! उद्या सुरू…!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदी काळात पुणेकरांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेली रिक्षा सेवा आजचा दिवस पोलिसांकडून होणाऱ्या त्रासामुळे बंद ठेवण्यात आल्याने पोलीस खात्यातील वरिष्ठ पातळीवर मोठी खळबळ उडाली. तात्काळ बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात आला असून, आता या रिक्षा चालकांना नवीन पास देण्यात येणार आहेत. तशी माहिती अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आटो रिक्षा फेडरेशनचे बापू भावे यांनी फोनकरून दिली आहे. त्यानंतर ही रिक्षा सेवा उद्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात पोलिसांनी वाहने रस्त्यावर आण्यास देखील मनाई केली आहे.

मात्र, या कालावधीत पुणेकरांना अत्यावश्यक गरज पडल्यास त्यांच्यासाठी पुणे पोलिसांनी रिक्षा सेवा सुरू केली होती. वाहतूक विभागाच्या मार्फत ही सेवा सुरू होती. त्यांना पासेस देण्यात आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चालक या काळात ही पुणेकरांची सेवा करत होते. विशेष म्हणजे सॅनीटाइझ केलेले हे रिक्षा असत. तर चालक सॅनीटायझरचा वापर करत होते. त्यामुळे नागरिकांना रिक्षा चालकापासून कसलाच धोका नव्हता. या कालावधीत याचा पुणेकरांना मोठी फायदा झाला आहे.

मात्र, दररोजच पोलिसांकडून वेगवेगळ्या सूचना स्थानिक पोलिसांना मिळत आहेत. त्यामुळे त्यांनाही त्यांचाही गोंधळ उडत आहे. त्याचाच फटका या रिक्षा चालकांना बसला. त्यांना वाहतूक विभागाने रिक्षा चालकांना पासेस दिले होते. परंतु स्थानिक पोलीस आता हे पास चालणार नाही असे म्हणून त्यांची अडवणूक करू लागल्याने रिक्षा चालकांमध्ये गोंधळ उडाला.

गेल्या दोन दिवसापासून सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांना “बारकोड शिवाय पास चालणार आहे,” “पोलीस ठाण्याचा पास असल्याशिवाय गॅस पंप सुरू करू देणार नाही” तसेच काही भागात या रिक्षा चालकांना अडविल्यानंतर पास फाडून टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे”. यामुळे रिक्षा चालकांनी सेवा देण्याचे काम आज बंद ठेवले.

त्याची दखल वरिष्ठ पातळीवर तात्काळ घेण्यात आली. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन हातावर तोडगा काढला. तसेच या रिक्षा चालकांना नवीन पास देण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.
यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बाऊ भावे यांना संपर्ककरून नवीन पास देण्यात येतील. सेवा सुरू ठेवण्याबाबत सांगितले. मात्र, पासेस मिळाल्यानंतर सेवा सुरू करण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे. त्यामुळे आजची सेवा बंद राहिली आहे.

11 हजार नागरिकांचे कॉल; दीड हजार जणांना सेवा
पुणेकरांसाठी ही सेवा सुरू करण्यात आल्यानंतर गेल्या आठ दिवसात 11 हजार नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यातील निम्याहून अधिक नागरिकांना उत्तरे देण्यात आली. तर दीड हजार नागरिकांना प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे.