मुळशीत खंडणी बाहद्दरांसह त्यांचे साथीदार अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्टर व त्याच्या सहकाऱ्याला मागील दोन वर्षापासून खंडणी व दर महिन्याला दहा रुपयांचा हप्ता देण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांच्या पौड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हि कारवाई शनिवारी (दि.12) करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपींना अटक केली.

अनुप बाळासाहेब मारणे त्याचा साथिदार रितेश सुभाष शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रसाद नवसकर हा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुळशी तालुक्यातील एका कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. आरोपी अनुप मारणे याचे साथिदार रितेश शिंदे आणि प्रसाद नवसकर यांनी तक्रारदार यांना फोन करून हप्त्याची मागणी केली. तसेच हप्ता दिला न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

अनुप मारणे व त्याचे साथीदार रितेश सुभाष शिंदे व प्रसाद नवसकर यांनी खंडणी स्वरुपात प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये हप्ता घेतला असुन, पुन्हा ऑक्टोबर पासून वीस हजार रुपये हप्ता वाढवुन घेतला. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी तक्रारदार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने 15 हजार रुपये घेतले. आरोपींनी तक्रारदा यांच्याकडून आतापर्यंत 2 लाख 50 हजार रुपयांची खंडणी उकळली आहे.

तक्रारदार यांनी शनिवारी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला. पोलिसांच्या पथकाने अवघ्या दोन तासात आरोपी अनुप मारणे आणि रितेश शिंदे यांना अटक केली.

हि कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षकविवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार शंकर नवले, पोलिस नाईक सुहास देवकाते, जय पवार, नितीन गार्डी, विजय कांबळे, विकास कांबळे, सुधीर होळकर, पोलीस हवालदार मगर, रावते, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नलवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर करीत आहे.