पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश
दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – सोलापूर महामार्गावरील (puns-solapur highway) एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश करण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे तर 3 महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या अनुराधा हॉटेल (Anuradha hotel) येथे करण्यात आली.
महामार्गालगत असलेल्या अनुराधा हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाली. त्यांनी या बद्दलची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकण्याचे नियोजन केले.
पोलिसांनी अनुराधा हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर सेक्स रॅकेटची खबर पक्की झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका पोलिसांनी केली. त्यापैकी दोन महिला या पश्चिम बंगालमधील आहेत तर एक महिला महाराष्ट्रीयन आहे.
पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल चालक दिवाकर मथु शेट्टी (वय-34 रा. उडपी, कर्नाटक) व डायसन डेनिस डिसूजा (वय-27) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.