Pune-Purandar Airport | पुरंदर विमानतळाचे भूसंपादन एमआयडीसी कायद्यानुसार (MIDC Act)

पुणे : Pune-Purandar Airport | पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन (Land Acquisition For Pune Purandar Airport) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूसंपादन कायद्यानुसार करण्यात येणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेंट कंपनी (maharashtra airport development company) – MADCआणि जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्रकल्पाबाबत आतापर्यंत केलेल्या सर्व कार्यवाहीचा कागदोपत्री अहवाल एमआयडीसीकडे देण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. (Pune-Purandar Airport)

विभागीय आयुक्त सौरभ राव (pune divisional commissioner saurabh rao) यांनी जिल्हाधिकारी, एमएडीसी, एमआयडीसीमधील अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. एमएडीसी, जिल्हा प्रशासनाने अहवाल दिल्यानंतर

भूसंपादनासाठी पुढील कार्यवाही करून जमिनीच्या मुल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा प्रशासन आणि एमएडीसीच्या सहकार्याने मार्गी लावून जमिनीच्या भूसंपादनासाठीचे पर्याय निश्चित करण्यात येणार आहेत, असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. (Pune-Purandar Airport)

राव यांनी पुरंदर विमानतळाच्या जुन्या जागेबाबत निश्चित केलेल्या जमिनीच्या सर्वेक्षण क्रमांकाचे सर्व तपशीलवार अहवाल एमआयडीसीकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.
नियोजित विमानतळ प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेले नकाशे, बाधित गावातील जागांचे सर्वेक्षण क्रमांक
हे एमएडीसीसोबत सामाईक केल्यास त्याच्या मदतीने एमआयडीसी देखील स्वतंत्र नकाशे तयार करेल.
त्यामुळे अधिसूचना जारी करण्यास मदत होणार आहे.

विमानतळ प्रकल्पाच्या कामाच्या कार्यवाहीबाबत विभागीय आयुक्तांनी एमएडीसीने आतापर्यंतचे कागदोपत्री अहवाल एमआयडीसीकडे देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार एमआयडीसी भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दीपक नलावडे, समन्वय अधिकारी, एमएडीसी (Deepak Nalavde, Coordination Officer, MADC)

Web Title :-  Pune-Purandar Airport | Land acquisition of Purandar Airport as per MIDC Act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन दिल्ली दौरा करणार, रुम्स देखील बुक केल्या

High Uric Acid च्या रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 5 चूका, अन्यथा वाढू शकतो त्रास