लॉकडाऊनमध्ये पुण्यातील PWD चा शाखा अभियंता 2 लाख 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) शाखा अभियंत्याला अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईकरून रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

विलास गोपाळराव तांभाळे (वय 57) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडगार्डन परिसरात पीडब्ल्यूडीचे ऑफिस आहे. याठिकाणी विलास हे क्रमांक चारच्या पुणे-पूर्व विभागा अंतर्गत शाखा अभियंता आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांना बांधकाम विभागाचे पुणे जिल्ह्यातील रस्त्याचे काम करण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यांनी हे काम पूर्ण केले. या कामाचे 50 लाखाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. हे बिल पुढे मंजुरीसाठी पाठविण्यास शाखा अभियंता म्हणून सही करून ते मजूर करिता पाठविण्यास 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना तडजोडीअंती अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्यात कोरोना आजाराच्या प्रादुर्भावमुळे असलेले लॉकडाऊन उघडताच लाचखोरी सुरू झाल्याचे दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like