Pune : राघव मालपाणीची पियानोवर राष्ट्रगीत वादक म्हणून वर्ल्ड रेकाॅर्ड इंडियाने घेतली नोंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील राघव मालपाणी या अवघ्या 4 वर्षाच्या चिमूरड्याची जगातील सगळ्यात लहान वयाचा पियानोवर राष्ट्रगीत वादक म्हणून वर्ल्ड रेकाॅर्ड इंडियाने नोंद घेतली आहे.

पुण्याच्या विखे पाटील मेमोरीयल स्कूल मधे शिकणाऱ्या राघवने हा रेकाॅर्ड स्थापित केला आहे. राघवची आई सोनल मालपाणी हिने ही माहिती दिली आहे. राघव कुठल्याही संगीत शिक्षणाशिवाय केवळ त्याच्या आई व बहिणीच्या पियानोवरील धून ऐकून पियानो शिकला आहे. राघव राष्ट्रगीताबरोबरच इतर गाणीही सुरेख व सुरेल वाजवतो.

wold record

राघवने अनेक फेसबुक समूह आणि गणेश फेस्टिव्हल मधून आपली कला सादर केली आहे. इतक्या लहान वयातही त्याचे “राघवन-दी रायझिंग सेन्सेशन” नावाचे यू ट्यूब चॅनेलही आहे. त्याच्या संगीताच्या ज्ञानाची त्याचे शिक्षक, शाळेच्या प्रिन्सिपल मृणालिनी भोसले यांच्यासकट अनेक मान्यवरांनी दखल घेतली अाहे.