Pune Railway News | वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील लोको पायलट गायब; दोन दिवसांपासून तपास सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Railway News | पुण्यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुणे रेल्वे चालकांपैकी (मोटरमॅन) एक लोको पायलट दोन दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानक प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. लोको पायलट गेल्या दोन दिवसांपासून घरी गेला नाही. त्यामुळे त्याची पत्नी चिंताग्रस्त आहे. त्यांच्या पत्नीने प्रशासनाला धारेवर धरले आहे. (Pune Railway News)

 

हरिश्चंद्र अंकुश असे या लोको पायलटचे नाव असून, शुक्रवारी 11 तासांची शिफ्ट करून ते घरी निघाले होते. मात्र, त्यांना वरिष्ठांनी आणखी चार ते पाच तास कामावर थांबण्याची सूचना केली. वरिष्ठांनी त्यांच्याकडे तगादा लावला असतानाही, ते शक्य नाही, आपल्याला विश्रांतीची गरज आहे, असे सांगून हरिश्चंद्र अंकुश कार्यालयातून निघून गेले. पण ते घरी गेले नाहीत. हरिश्चंद्र अंकुश निघून गेल्यानंतरदेखील वरिष्ठांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. आमचे ऐका नाहीतर, तुमची बदली करू, अशी धमकी वरिष्ठांनी त्यांना दिली. त्यामुळे गेले दोन दिवस ते बेपत्ता आहेत. ते कामावरदेखील गेले नाहीत. त्यामुळे प्रशासन आणि त्यांच्या पत्नीने शोधाशोध सुरू केली आहे. (Pune Railway News)

या प्रकरणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव सुनील बाजारे आक्रमक झाले असून,
त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्याचसोबत बाजारे यांनी काम बंदचा इशाराही प्रशासनाला दिला आहे.
संबंधित रेल्वे चालकाच्या पत्नीने पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
पत्नीने सोमवारी पुणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर आंदोलन केले. 48 तासांमध्ये माझ्या पतीला शोधून काढा,
अन्यथा पुण्याहून एकही रेल्वे सुटणार नाही, असा इशाराच अंकुश यांच्या पत्नीसह इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुणे रेल्वे प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

 

Web Title :- Pune Railway News | pune railway loco pilot goes missing after tired of seniors troubles wife gives ultimatum

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात