रेल्वे स्टेशनवरील बाकड्यावर विसरलेली पर्स पुणे लोहमार्ग पोलिसांनी केली परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लोकल पकडण्याच्या घाईगडबडीत खडकी रेल्वे स्थानकावरील बाकड्यावर महिलेची पर्स विसरली. खडकी लोहमार्ग पोलिसांनी पर्स ताब्यात घेऊन पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांनी महिलेची पर्स तिच्या भावाकडे सुपुर्त केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11c1e6dc-c0af-11e8-9014-0132259cb99c’]

याबाबतची माहिती अशी, श्रीदेवी राजेंद्र सत्तरगी (रा. खोपोली) या आपल्या दोन लहान मुले व भावासह खडकीला आल्या होत्या. शनिवारी (दि. २२) सकाळी १० वाजता त्या परत खोपोलीला जात होत्या. लोकलची वाट पाहत असताना त्यांनी तेथील बाकड्यावर बॅग ठेवली. लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांची पर्स बाकड्यावर  तशीच राहिली. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते.

मालदीवला चीनपासून मिळणार मुक्ती ? 

सहायक फौजदार आर. एन. जोशी आणि पोलीस शिपाई एम. बी. भोई हे प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असताना त्यांना बाकड्यावर पर्स सापडली. त्यांनी ती घेऊन पोलीस चौकीत आले असता पर्समधील मोबाईलची रिंग वाजू लागली. तेव्हा त्यांनी ती बॅग उघडली. भीमाशंकर लांबजरे यांनी ही बॅग आपल्या बहिणीची असून आपण कासारवाडी स्टेशनला उतरुन पुन्हा माघारी येत असल्याचे सांगितले. बॅगेत ५४ हजार ९४० रुपये, सोनसाखळी व मोबाईल असा ९० हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांनी खात्री करुन ही बॅग त्यांना परत केली.
लोकल गेल्यावर खडकी रेल्वे स्टेशन निमनुष्य होते. पोलिसांच्या नजरेला ही बॅग पडली नसती तर ती संबंधितांपर्यंत पोहचणे मुश्किल झाले असते.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2edb6519-c0af-11e8-9a6b-0373a0203765′]