पुणे रेल्वे स्टेशनवरून मुल पळवून नेल्याचा बनाव, रेल्वे पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे रेल्वे स्टेशनवरून मुल पळवून नेल्याचा बनाव केल्या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी योग्यरितीने तपास करून हे प्रकरण बनाव असल्याचं उघडकीस आणलं आहे.

लक्ष्मी राजु उर्फ बाळु चव्हाण (३५, रा. अंकेला कोंडापुर तांडा, ता. मेहबुबनगर, जि. हैद्राबाद. सध्या रा. जेजुरी रेल्वे स्टेशनजवळ) यांनी रेल्वे पोलिसांकडे त्यांचे मुल कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार नोंदवली होती. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांनी लक्ष्मी चव्हाण हिला विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता तिने बनाव रचल्याचं मान्य केलं. नवरा-बायको मजुरी करीत असून आम्ही आमच्या मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत म्हणून हे कृत्य केल्याचं तिनं मान्य केले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधीक्षक दिपक साकोरे, अप्पर अधिक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मौला सय्यद, सहाय्यक निरीक्षक मिलींद झोडगे, विशाल पाटोळे, पोलिस कर्मचारी विष्णु गोसावी, अमरदीप साळुंके, सचिन राठोड, सयाजी पाटील, बेबी थोरात आणि लक्ष्मी कांबळे यांच्या पथकाने हा बनाव उघडकीस आणला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –