Pune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ! ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे रेल्वे स्थानकातुन (Pune Railway Station) सर्वत्र रेल्वे मार्गस्थ होत असतात. त्यामुळे या स्थानकावर नेहमीच जास्त भार असतो. अनेक वेळा प्रवाशांचीही गैरसोय होत असते. मात्र आता मध्य रेल्वेने पुणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हडपसर टर्मिनलचा सॅटेलाइट टर्मिनल (hadapsar satellite terminal) म्हणून विकास करण्यात येत आहे. भविष्यात त्या ठिकाणाहून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी (Anil Kumar Lahoti, General Manager, Central Railway) यांनी सांगितले. (Pune Railway Station)

 

रेल्वेच्या लोणावळा ते दौंड मार्गावरील (lonavala to daund train) विविध कामांची पाहणी करून लाहोटी यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी मध्य रेल्वे पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा (Renu Sharma, Manager, Central Railway Pune Division) उपस्थित होत्या.

 

लाहोटी म्हणाले, हडपसर येथून सध्या हडपसर- हैदराबाद (hadapsar to hyderabad trains) ही एकच गाडी धावते. त्यामुळे आगामी काळात या स्थानकातून जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हडपसर टर्मिनलसाठी असणारी जागा अपुरी आहे. त्यामुळे भारत फोर्ज (bharat forge pune) कंपनीची जागा ताब्यात घेण्याबाबत सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ती जागा मिळाल्यास येथील संचलन वाढवणे शक्य होईल.

 

निर्भया फंड’अंतर्गत पुणे (Pune Railway Station), शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी आणि चिंचवड आदी स्थानकात CCTV बसविण्यात आले असून कॅमेऱ्यांची क्षमता २ मेगापिक्सलने वाढवली आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांवर वचक बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून (mumbai railway vikas corporation) पुणे-लोणावळा (pune to lonavala train) तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम केले जात आहे. रेल्वे आणि राज्य सरकारकडून याचा खर्च उचलण्यात आला असून या प्रकल्पासाठी राज्याचा निधी मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्याचेही लाहोटी यांनी सांगितले.

 

गाड्यांचा वेग वाढणार?

शुक्रवारी लोणावळा ते तळेगावदरम्यान (lonavala to talegaon local) प्रतितास १२० किमी तर
उरळी ते पाटसदरम्यान १३० किमी वेगाने गाडी चालवण्याची चाचणी झाली.
सध्या या टप्प्यात अनुक्रमे प्रतितास ११० किमी, १२० किमी वेगाने गाडी जाते. या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या आहे.
त्यामुळे आता भविष्यात पुणे-दौंड मार्गावरील (pune to daund train route) लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

 

दौंडला उपनगरीय लोकल नाहीच
पुणे-लोणावळ्याप्रमाणे पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय सेवेचा दर्जा देऊन तेथे लोकल सेवा सुरू करण्याच्या विषयाला मध्य रेल्वेने तूर्तास स्थगिती दिली आहे.
सध्या ‘डेमू’द्वारे या मार्गावर प्रवासी सेवा दिली जात असून, तीच कायम राहणार आहे, असे अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले.

 

पिंपरी स्थानक हरित उर्जेवर
सौर पॅनेलद्वारे पिंपरी (Pimpri Railway Station), शिवाजीनगर (Shivaji Nagar Railway Station)
आणि खडकी (Khadki Railway Station) येथे रेल्वे स्थानकांवर उर्जा निर्मिती केली जात आहे.
पुणे स्टेशन येथे सौर पॅनेल उभारणीचे काम सुरू आहे.
पिंपरी स्थानकात निर्माण होणाऱ्या सौर उर्जेवर स्थानकातील सर्व विद्युत उपकरणे कार्यान्वित केली जात आहे.
त्यामुळे पुणे विभागातील पिंपरी स्थानक हे पहिले हरित स्थानक ठरले आहे. (Pune Railway Station)

 

Web Title :- Pune Railway Station | central railway takes big decision to ease the burden on pune railway station Anil Kumar Lahoti, General Manager, Central Railway hadapsar satellite terminal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची आफ्रिकेत ‘कमाल’

IPL 2022 | विराट कोहलीचा कॅप्टन होणार आयपीएलमधील ‘या’ टीमचा हेड कोच!

Pune Crime | पुण्यात बाजीराव रोडवर ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या चौघांना अटक; दरोड्याचा गुन्हा दाखल