Pune Railway Station News | पुणे रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व पाणी बॉटल विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईचा दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Railway Station News | पुणे रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांची झुंबड दिवसेंदिवस वाढत होती. या अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांची फसवणूक होत असल्याची तक्रार (Complaint) सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे (Railway Administration) येत होती. या विरोधात ॲक्शन मोडमध्ये येत रेल्वेच्या पुणे विभागाने (Railways Pune Division) अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. (Pune Railway Station News)

पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station News) परिसरात अनेक अनधिकृत विक्रेते (Unauthorized Vendors), फेरीवाले खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटलींचा व्यवसाय करत आहेत. या अनाधिकृत विक्रेत्यांकडून निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ (Poor Quality Food), अनधिकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री, छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत पाण्याच्या बॉटल (Water Bottles) विकून प्रवाशांकडून जास्त पैसे उकळत होते. याबाबत सातत्याने तक्रार येत असल्याने १ एप्रिल ते १४ मे या कालावधीत ७४ अवैध विक्रेत्यांना कारवाईचा दणका बसला आहे.

या कारवाईमध्ये ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून, त्यांना रेल्वे सुरक्षा दलाकडे (Railway Security Force)
सोपवण्यात आले आहे. हे सर्व अनधिकृत विक्रेते पुणे स्थानकावर विनापरवाना (Without License)
खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची विक्री करीत होते. त्यांच्याकडून २ हजार ७४८ अनधिकृत पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, रेल्वे न्यायालयाने या विक्रेत्यांना ४९ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार (Assistant Commercial Manager Ajay Kumar) यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी, अन्नपदार्थ निरीक्षक कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली.

या कारवाईवर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे (Dr. Milind Hirwe) यांनी
प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, रेल्वे स्थानकाच्या आवारात अनधिकृत विक्रेत्यांचे प्रमाण वाढले होते.
वाणिज्य विभागाकडून (Commerce Department) सातत्याने कारवाई सुरू असल्याने हे प्रमाण आता कमी झाले आहे. (Pune Railway Station News)

Web Title : Pune Railway Station News | Action taken against unauthorized vendors selling substandard food and bottled water at Pune railway station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

Solapur Crime News | सीआयडीचे पथक अटकेसाठी आल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr. PI), सहाय्यक निरीक्षकासह 7 पोलिस ‘फरार’

Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारेंचे काहीच चुकले नाही, पण बीडच्या जिल्हाध्यक्षांचे आरोप महत्त्वाचे’, भाजप आमदाराचे ठाकरेंवर गंभीर आरोप (व्हिडिओ)